ग्रामस्वच्छतेत निरवडे ग्रामपंचायतची निवड
न्हावेली / वार्ताहर
राज्यातील सत्तावीस हजारापेक्षा जास्त ग्रामपंचायतीपैकी निरवडे ग्रामपंचायतची निवड संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यस्तरावर होते.ही बाब कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय अवर सचिव चंद्रकांत मोरे यांनी केले. जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतीने निरवडे ग्रामपंचायतचा आदर्श घ्यावा आणि गावाचा विकास करावा,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
निरवडे गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला.त्यानंतर राज्यस्तरीय विभागासाठी या ग्रामपंचायतीची निवड झाली होती.याबाबतचे मुल्यांकन करण्यासाठी राज्यस्तरीय टीम गावामध्ये दाखल झाली.यावेळी कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी श्री.मोरे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे,पाणीपुरवठा स्वच्छता विभाग सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश पात्रे,उपमुख्य अधिकारी विनायक ठाकूर,पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, विस्तार अधिकारी प्रशांत चव्हाण,विस्तार अधिकारी श्री.धर्णे,एकनाथ सावंत,स्वच्छता मिशन अधिकारी अविनाश सावंत, समिल नाईक,प्रज्ञा सावंत,श्री पिंगु्ळकर,निरवडे सरपंच सुहानी गावडे,उपसरपंच अर्जुन पेडणेकर,ग्रामसेवक सुनिता कदम,माजी सरपंच प्रमोद गावडे,हरि वारंग,सदा गावडे, चंद्रकांत गावडे,नागेश गावडे,धर्माजी गावडे,आदेश जाधव,दशरथ मल्हार,आंनदी पवार,अंगारिका गावडे,प्रगती शेटकर,रेश्मा पांढरे,निधी शिरोडकर,सिताराम गावडे,शाम बर्डे,चैताली गावडे,अंकिता बागकर,राजश्री गावडे,समिक्षा जाधव,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशासेविका आदी ग्रामस्थ उपस्थित होते.माजी सरपंच गावडे व हरि वारंग यांनी गावात केलेल्या कामांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
विकासाचा पायंडा सुरुच ठेवा : श्री मोरे
यावेळी श्री मोरे म्हणाले की,निरवडे ग्रामपंचायतीने काम उकृष्टरित्या सुरु आहे.या गावातील आजी माजी सर्व सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांचे यासाठी अभिनंदन करतो निरवडेला पुरस्कार मिळण्याचे काम अविस्तरपणे सुरु आहे.त्यामुळे पुढील काळातही विकासाचा पायंडा असाच सुरु ठेवा ज्याठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी यांचा विचार सुसंवाद आणि समन्वय असेल त्याठिकाणी निरवडे ग्रामपंचायतीसारखी प्रभावशाली आणि प्रगतशील ग्रामपंचायत होऊ शकते.त्यामुळे जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतीने सुद्धा अशाच प्रकारे आपापल्या गावाचा विकास करणे गरजेचे आहे.या अभियानामध्ये राज्यस्तरावर एकूण पंधरा ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.त्यात जिल्ह्यातून निरवडे ग्रामपंचायत निवड झाली आहे.ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.