महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिवाजी विद्यापीठाच्या बॅंकिंग संशोधन मंडळावर निपुणराव कोरे यांची निवड

05:35 PM Dec 16, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

Advertisement

श्री.वारणा सहकारी बँक लि. वारणानगर व कोल्हापूर नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष निपुणराव विलासराव कोरे (दादा) यांची महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी महाराष्ट्र शासन सार्वजनिक विद्यापीठ कायदा तरतुदी नुसार शिवाजी विद्यापीठाच्या संशोधन मंडळावर बॅंकिंग क्षेत्रातील तज्ञ म्हणून नियुक्ती केलेबाबत पत्र दिले असून श्री कोरे यांच्या निवडीमूळे विद्यापीठ परिसरात बॅंकिंग विषयातील संशोधनास गती मिळणार आहे.

Advertisement

शिस्तीचे व्यवस्थापन जनतेत निर्माण केलेल्या विश्वासाच्या बळावर निपून कोरे यानी श्री. वारणा सहकारी बँक राज्यात सहकारातील आदर्श बॅक म्हणून नावारूपाला आणली आहे या कार्यामुळेच कोल्हापूर नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यानी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून त्यांच्या निवडीने वारणा समूहात तसेच परिसरात आनंद व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :
#selection#ShivajiUniversityBanking Research Boardnipunraokoretarunbharat
Next Article