महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी खादरवाडीच्या खेळाडूंची निवड

10:48 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

सारंगपूर-उत्तरप्रेदेश येथे होणाऱ्या सबज्युनिअर राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी खादरवाडी येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या तीन खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या 4 ते 6 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रताप शिवनगेकर 40 किलो वजन गट, अझान शरीफ 70 किलो वजन गट व सिद्धांत कडली 55 किलो वजन गटामध्ये कुराश या स्पर्धेत कर्नाटक संघातर्फे भाग घेणार आहेत. खादरवाडीसह बेळगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. कुराश हा ज्युडो प्रकारात प्रताप व सिद्धांत हे खादरवाडी गावचे सुपुत्र आहेत. तर अझान हा भवानीनगर येथील आहे. या तिघांनीही यापूर्वी कुस्ती व ज्युडोमध्ये जिल्हा व राज्य पातळीवर विविध पारितोषिके मिळविलेली आहेत. त्यांच्या या खेळातील कौशल्यामुळे त्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य संघात स्थान मिळाले आहे. या खेळाडुंना संस्थेचे अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू, मुख्याध्यापिका वनश्री नायर व क्रीडा शिक्षक अतुल शिरोले यांचे प्रोत्साहन लाभत आहे. हे तिन्ही खेळाडू स्पधेसाठी शुक्रवारी सायंकाळी रेल्वेहून दिल्लीला रवाना झाले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article