हॉटेल पॉम्पसचे मालक जितेंद्र पंडित यांची स्वदेश दर्शन समितीच्या सदस्यपदी निवड
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने समिती गठीत
सावंतवाडी | प्रतिनिधी
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने स्वदेश दर्शन वीस ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या स्वदेश दर्शन योजनेसाठी समिती गठीत करण्यात आली आहे . या समितीच्या सदस्य पदी सावंतवाडी येथील सुंदर वाडी हेल्पलाइन फाउंडेशनचे सचिव तथा पॉम्पस हॉटेलचे मालक जितेंद्र उर्फ जितू पंडित यांची निवड करण्यात आली आहे. श्री पंडित हे सावंतवाडी सुंदरवाडी हेल्पलाइन फाउंडेशन ग्रुप मध्ये गेली कित्येक वर्ष कार्यरत आहेत. सामाजिक व पर्यटन या विषयात त्यांना विशेष रस आहे . सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक समितीवरही ते आहेत. सावंतवाडी संस्थानकालीन शहर पर्यटन दृष्ट्या विकसित व्हावे. तसेच मुंबई -गोवा हायवे सावंतवाडी शहरा बाहेरून गेल्याने सावंतवाडी शहराला पूर्वीप्रमाणे गत वैभव प्राप्त व्हावे यासाठी श्री पंडित कार्यरत आहेत. त्यासाठी त्यांनी हॉटेल तसेच अन्य व्यावसायिकांना एकत्र करून पर्यटन दृष्ट्या शहरात काही उपक्रम राबवता येतील का या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यांची स्वदेश दर्शन समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सुंदर वाडी हेल्पलाइन फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजन आंगणे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.