कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्रम्हलिंगेश्वर अलतगा खो -खो संघाची निवड

10:37 AM Oct 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या ग्रामीण कडोली विभागीय क्रीडा स्पर्धेत खो खो प्रकारात अलतगे येथील ब्रम्हलिंगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने  विजेतेपद पटकावित यश संपादन केले आहे. आंबेवाडी येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावित सौंदत्ती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तो संघ पात्र ठरला आहे. संघाला मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक आर. आर. जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या संघात सायली चौगुले, समीक्षा पाटील, संचिता पाटील, हेमा आलोजी, हर्षदा लोहार, पूजा कडोलकर, सारिका भुजबळ, श्रद्धा पाटील, कृती आलोजी, श्रृती आलोजी, नेहा पाटील, श्रृती पाटील आदी खेळाडूंचा समावेश असून मुलांमध्ये यश चौगुले, सोहम पाटील व माणिक चौगुले या तीन खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तालुका संघात निवड झाली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article