भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स मध्ये निवड
04:56 PM May 03, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी
Advertisement
सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे.कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल शाखेच्या ७१ विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू टाटा मोटर्सतर्फे घेण्यात आले. त्यापैकी ३६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून जून महिन्यापासून हे विद्यार्थी कंपनीच्या पुणे येथील उत्पादन प्रकल्पावर रुजू होतील अशी माहिती कॉलेजचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा.मिलिंद देसाई यांनी दिली.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Advertisement
Advertisement
Next Article