For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी बेळगावच्या 5 स्केटर्सची निवड

10:05 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी बेळगावच्या 5 स्केटर्सची निवड
Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या 5 स्केटर्सची आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नमवॉन कोरियामध्ये  होणाऱ्या स्पर्धेत ते भाग घेणार आहेत. सदर स्पर्धेसाठी निवडलेल्या स्केटर्सचे नावा  फ्री स्टाइल स्केटिंग : हिरेन राज, रश्मिता अंबिगा, देवेन बामणे, जयधन राज यांची तर  इनलाइन हॉकी स्पर्धेत मंजुनाथ मंडोळकर याची निवड झाली आहे. त्याबद्दल  सत्कार झाला. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने गोवावेस स्केटिंग रिंक येथे या सर्व स्केटर्सचा सत्कार नितीन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विनोद बामणे, दिनेश अंबिगा, शिवराज, ज्योती बामणे, नयना शिवराज, प्रशांत कांबळे बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स, पालक व इतर मान्यवर उपस्थित होते. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, विशाल वेसाने, विश्वनाथ येल्लुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्केटिंगपटू  केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर, कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी गोवावेस आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब, येथे सराव करत असून त्यांना डॉ. प्रभाकर कोरे, श्री शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए यांचे प्रोत्साहन  मिळत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.