राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी 24 विद्यार्थ्यांची निवड
10:15 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : येथील एमजीव्हीएम पीयू कॉलेज आयोजित 19 वर्षांखालील पदवीपूर्व महाविद्यालयीन जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्यावतीने पार पडल्या. या स्पर्धेमध्ये 150 कराटे स्पर्धकांनी भाग घेतला. 24 स्पर्धकांनी अव्वल मानांकन मिळवले. चुरशीच्या स्पर्धेनंतर 13 मुले आणि 11 मुलींची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत निवड झाली असून ते जिह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक कांबळे, प्राचार्य नेगनाळ, व्यवस्थापक रेड्डी, जी. एन. पाटील, प्रभू शिवनाईकर उपस्थित होते. यावेळी गजेंद्र काकतीकर, रमेश अलगुडेकर, जितेंद्र काकतीकर, डॉ. अमित जडे, विठ्ठल भोजकर,परशुराम काकती आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement