For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेचक-वेधक

06:10 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेचक वेधक
Advertisement

ड अमेरिकेचा इराणला 48 तासांचा ‘अल्टिमेटम’

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणला 48 तासांचा अंतिम कालावधी दिला आहे. या कालावधीत इराणने अमेरिकेशी करार करावा आणि शांतता प्रस्थापित करावी. तसे न केल्यास अमेरिका इराणवर आतापर्यंत कधीही केला नव्हता, असा हल्ला करेल. इराणची पूर्ण दुर्दशा आमच्या आघातांमुळे होईल, असा इशाराही अध्यक्ष ट्रंप यांनी दिला आहे. आपल्या ‘ट्रूथ सोशल’ या वेबसाईटवर त्यांनी हा संदेश दिला. ‘मी इराणला 10 दिवस दिले आहेत. त्यांच्यापैकी आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. या कालावधीचा इराणने सदुपयोग करावा. आमच्याशी करार करावा आणि होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त करावी. अन्यथा, त्या देशावर आम्ही प्रचंड आघात करणार आहोत, असे ट्रंप यांनी स्पष्ट केलेले आहे.

ड शिक्षण आणि संशोधन संस्थांवर आघातांचा आरोप

Advertisement

अमेरिका आणि इस्रायल आमच्या शिक्षण संस्थांवर आणि संशोधन संस्थांच्या आस्थापनांवर हेतुपुरस्सर हल्ले करीत आहेत, असा आरोप इराणने केला आहे. इराणचे विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन मंत्री हुसेन सिमेई सारफ यांनी शनिवारी हे आरोप केले. या हल्ल्यांमुळे इराणमधील लक्षावधी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. इराणच्या अनेक शिक्षण संस्थांमधील इमारती या हल्ल्यांमध्ये एकतर नष्ट झाल्या आहेत, किंवा त्यांची मोठी हानी झाली आहे. मात्र, इस्रायलने इराणचे आरोप नाकारले आहेत. इराणचा अणुबाँब बनविण्याचा कार्यक्रम आमच्यासाठी धोकादायक असल्याने आम्ही हे हल्ले करीत आहोत. इराणचा हा कार्यक्रम काही शिक्षणसंस्थांमधूनही चालतो. त्याविरोधात हे अभियान असल्याचे स्पष्ट केले गेले.

ड संयुक्त अरब अभिरातीकडून हल्ल्यांचा निषेध

संयुक्त अरब अमिरातीच्या प्रशासनाने इराणकडून होत असलेल्या हल्यांचा निषेध केला आहे. इराणने अमिरातीच्या दामास्कस येथील दूतावासावर आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे या दूतावासाच्या काही भागाची हानी झाली आहे. इराणने अमिरातीच्या बगदाद येथील दूतावासांवरही हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे हा संघर्ष अधिक चिघळणार आहे, असा इशारा संयुक्त अरब अमिरातीकडून देण्यात आला. या युद्धात आतापर्यंत इराणने अमिरातीवर अनेकदा हल्ले केले आहेत. त्यामुळे या देशांमधील व्यापार आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला असून अरब देशांची अर्थव्यवस्था मंद झाली आहे. मध्यपूर्वेतील छोट्या पण श्रीमंत देशांनाही या युद्धात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ड अण्विक प्रकल्पांवरील हल्ले ठरतील धोकादायक

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या काही अणुप्रकल्पांना लक्ष्य केले आहे. मात्र, या अणुकेंद्रांचा स्फोट झाल्यास मध्यपूर्वेतील अनेक शहरे नष्ट होतील. अमेरिकेचे मित्र असणाऱ्या देशांनाही घातक किरणोत्सर्जनामुळे मोठी हानी सोसावी लागेल. असंख्य नागरीकांचे मृत्यू होतील, असा इशारा इराणकडून देण्यात आला आहे. इराणची अणुबाँब बनविण्याची क्षमता नष्ट करणे, हा अमेरिका आणि इस्रायल यांचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे इराणच्या युरेनियम संपृक्त करणाऱ्या प्रकल्पांवर अमेरिका हल्ले करीत आहे. आतापर्यंत या युद्धात असे हल्ले तीनवेळा करण्यात आले आहेत. इराणच्या दोन अणुभट्टी परिसरांची या हल्ल्यांमुळे हानी झालेली आहे.  6 एप्रिलनंतर या हल्ल्यांमध्ये आणखी वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.