ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी सीमा मठकर रिंगणात
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातून माजी आमदार, समाजवादी नेते जयानंद मठकर यांच्या सून सीमा मठकर यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित झाले असून आम्ही स्वबळाची तयारी केली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली . सौ. मठकर यांनी स्पष्ट केले की , माझे सासरे माजी आमदार जयानंद मठकर यांचा वारसा आपल्याला कायम टिकवायचा आहे . त्यांचे सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान होते. सावंतवाडी शहर सुसंस्कृत शहर आहे. या शहराचा विकास व्हावा त्यासाठी आपण जनतेच्या हितासाठी रिंगणात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे असे सौ . सीमा मठकर यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहर संघटक निशांत तोरस्कर, शहर प्रमुख शैलेश गवंढळकर ,उमेश कोरगावकर, शब्बीर मणियार ,श्रुतिका दळवी,आशिष सुभेदार आधी उपस्थित होते.