महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओपी राजभर यांना वाय शेणीची सुरक्षा

07:00 AM Jul 23, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अखिलेश यादव यांच्यावर नाराज : भाजपसोबत वाढती जवळीक

Advertisement

वृत्तसंस्था /लखनौ

Advertisement

सप आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री ओमप्रकाश राजभर यांना उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने वाय शेणीची सुरक्षा दिली आहे. सप अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यानवर नाराज असलेल्या राजभर यांनी राष्ट्रपती निवडणुकीत रालोआ उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले होते. वाय शेणीची सुरक्षा मिळाल्याने राजभर यांची आता भाजपसोबत जवळीक वाढत असल्याचे मानले जात आहे.

गाझीपूरच्या जहूराबादचे राजभर हे आमदार आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. अखिलेश यांनी राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला 17 जागा दिल्या होत्या. राजभर यांचा पक्ष यातील 6 ठिकाणी विजयी झाला होता.

ओमप्रकाश राजभर हे स्वतःचा पक्ष गुंडाळून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आता जोर पकडू लागली आहे. परंतु अद्याप त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली नाही. ‘अखिलेश यादव यांच्याकडून घटस्फोट मिळाल्यावर 2024 बद्दल विचार करू. अखिलेश हे मुस्लिमांना भाजपची भीती दाखवून राजकीयदृष्टय़ा जिवंत आहेत. मुस्लिमांना ते भाजपची भीती दाखवतात आणि मुस्लीम त्यांना मतदान करतात. मुस्लिमांवर हल्ला झाल्यास मात्र ते मौन बाळगतात. मुस्लीम देखील अखिलेश यांचे हे राजकारण समजू लागले असल्याचे राजभर यांनी म्हटले होते.

राष्ट्रपती निवडणुकीत समाजवादी पक्षाने विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला होता. यशवंत सिन्हा हे प्रचारासाठी लखनौ येथे पोहोचले असता अखिलेश यादव आणि त्यांचे आघाडीतील सहकारी जयंत चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले होते. ओमप्रकाश राजभर यांना पत्रकार परिषदेत आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यानंतर राजभर यांनी रालोआ उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला होता.

ओमप्रकाश राजभर हे योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपसोबतची आघाडी संपुष्टात आणली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article