For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढविली जाणार

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढविली जाणार
Advertisement

वृत्तसंस्था /लंडन

Advertisement

ब्रिटनमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हिंदू मंदिरांच्या सुरक्षेसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. सुनक सरकारने ब्रिटनमधील हिंदू समुदायाच्या मागणीनंतर मंदिरांच्या सुरक्षेकरता 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. गृह मंत्रालय हिंदूंचे धार्मिक स्थळ आणि चर्चच्या सुरक्षेसाठी एक नवे धोरण तयार करत आहे. या नव्या धोरणाने आकार घेतल्यावर ब्रिटनमध्ये मंदिरांना देखील मशिदींप्रमाणे सुरक्षेसाठी निधी मिळणार आहे. पंतप्रधान सुनक हे अनेक हिंदू मंदिरांना भेट देत असतात. ब्रिटनमध्ये 400 हून अधिक हिंदू मंदिरे आहेत. सरकारकडून प्राप्त निधीद्वारे हिंदू मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत, यामुळे 24 तास सुरक्षा देखरेख होऊ शकणार आहे. पोलिसांना हिंदू मंदिरांवरील हल्ले रोखण्याच्या पद्धतींच्या प्रशिक्षणासाठी निधी प्राप्त होणार आहे. 2022 मध्ये ब्रिटनच्या लेंस्टेस्टरमध्ये अनेक हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने 300 कोटी रुपयांची धार्मिक स्थळ सुरक्षा फंडिग योजना घोषित केली होती. यातील बहुतांश हिस्सा इस्लामिक संस्थांना मिळत होता. तर केवळ 35 कोटी रुपयेच बिगरमुस्लिमांना प्राप्त झाले होते. यातील गुरुद्वारांना 7 कोटी तर हिंदू मंदिरांना 2.5 कोटी रुपये मिळाले होते. यावरून ब्रिटनमधील हिंदू समुदायात नाराजी होती. धार्मिक स्थळांच्या सुरक्षानिधीत भेदभाव योग्य नसल्याचे हिंदू समुदायाचे म्हणणे होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.