कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली स्फोटानंतर बेळगावमधील बंदोबस्तात वाढ

07:58 AM Nov 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रेल्वेस्थानक, विमानतळावर सतर्कता

Advertisement

► प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

देशाची राजधानी दिल्ली येथे झालेल्या भीषण स्फोटामध्ये दहाहून अधिक नागरिक ठार झाले. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांना हायअलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी बेळगाव रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक आणि सुवर्ण विधानसौधवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रवाशांच्या प्रत्येक साहित्याची तपासणी करण्यात येत होती. दिल्ली येथे झालेल्या स्फोटानंतर देशात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेळगाव शहर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मंगळवारी सकाळी बेळगाव रेल्वेस्थानकावर तपासणीला सुरुवात झाली. बोगीमधून उतरविण्यात आलेल्या साहित्याची तपासणी केली जात होती. त्याचबरोबर डॉगस्कॉडच्या मदतीने कोणत्याही संशयास्पद गोष्टींवर लक्ष ठेवले जात होते. आरपीएफ तसेच राज्य पोलिसांकडून रेल्वेस्थानकात तपासणी करण्यात येत होती. रेल्वेस्थानकावर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली. एक्स्प्रेस रेल्वेस्थानकात आल्यानंतर प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करण्यात आली. रेल्वेस्थानकाबरोबर शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

सुरक्षेसंदर्भात विमानतळावर बैठक

सांबरा येथील बेळगाव विमानतळाच्या सुरक्षेत सोमवारी रात्रीपासूनच वाढ करण्यात आली. तसेच विमानतळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान सुरक्षा यंत्रणांना कडक तपासणीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तसेच साहित्याची तपासणी केली जात आहे. राखीव पोलीस दलाकडून डॉगस्कॉडकडून तपासणी केली जात आहे. विमानतळ संचालक एस. त्यागराजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article