जातीच्या दाखल्यासाठी पाडले भाग
कोल्हापूर :
अकरावी, बारावी सायन्सच्या वर्गात जातीचा व जात पडताळणीचा दाखला काढावा, अशा सुचना देत जात पडताळणी कार्यालयाकडून महाविद्यालयातच मोहिम राबवली जाते. दाखला आवश्यक असणारे कुणबी, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय यांच्यासह अनेकजण याकडे कानडोळा करतात; माञ बारावी नंतर व्यावसायिक शिक्षणासाठी या दाखल्याची आवश्यक असल्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी- पालक जात पडताळणी कार्यालयासमोर गर्दी करत आहेत.
विचारमाळे येथील सामाजिक न्याय भवनातील जात पडताळणी कार्यालयाकडे जूनपासून गर्दी वाढू लागली आहे. जूनअखेर 2064 विद्यार्थ्यांनी या कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. दाखला दखल करण्यापासून ते त्यातील ञूटी दूर करण्यासाठी विविध दाखल्याचे पुरावे गोळा करत या कार्यालयात दररोज शे दोनशे विद्यार्थी पालक येत आहेत.
- अशी आहे दाखल्याची प्रोसेस
अर्ज आल्यानंतर डाटा कलेक्शन होते, त्यानंतर त्याची छाननी होते. छाननीनंतर तीन सदस्यीय समितीसमोर पडताळणी होते. त्यानंतर स्कॅनिंग अशा विविध प्रोसेसमधून जातीच्या दाखल्यासाठी जावे लागते. कागदपञे अपूरी राहील्यास ती जमा करण्यासाठीही सांगितले जाते. दाखल्याची माहिती मोबाईलवर संदेश व ईमेलवर दिली जाते. दाखला काढण्यासाठी कमीत कमी तीन महिने, ञूटी असल्यास पाच महिन्याचा कालावधी लागतो.
- अकरावीत दुर्लक्ष; बारावीनंतर लक्ष
सायन्सच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर व्यावसायिक शिक्षणासाठी दाखल्याची आवश्यकता लागते. अकरावी बारावीमध्ये फी कमी असल्यामुळे याकडे काही विद्यार्थी दूर्लक्ष करतात. बारावी व त्यानंतरच्या विविध सीईटीचा निकाल लागल्यानंतर अर्ज भरतानाच जातीचा उल्लेख करावा लागतो. यामुळे फीमध्ये सवलत मिळते. व्यावसायिक शिक्षणाची फी जास्त असल्यामूळे अनेकजण या प्रवेशाच्या अर्जात जातीची नोंद करतात. त्या जातीच्या कोट्यातून प्रवेश मिळाल्यामुळे जातीच्या दाखल्यासह जात पडताळणीचा दाखला जोडणे आवश्यक असते. अकरावीत दूर्लक्ष करणारे विद्यार्थी बारावीनंतर माञ दाखल्यासाठी अधिक लक्ष देतात.
- त्वरीत दाखल्यासाठी पालकांची घालमेल
सीईटीच्या निकालानंतर अर्ज केल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशावेळी जातीचा दाखला काढण्यासाठी वेळ कमी मिळतो. त्यातच एखादी कागदपञे नाही मिळाली तर ञूटीसाठीही वेळ जातो. या कालावधीत पालकांचीही तारांबळ उडते. 1950 पुर्वीपर्यंतचे दाखले महसूल पुरावे, वंशावळ काढताना पालकांना दम भरतो त्यामुळे या कार्यालयाकडे त्यांच्या फेऱ्या वाढतात. दाखल्यासाठी पालकांची घालमेल सुऊ असल्याचे चिञ दिसत होते.
- शनिवार, रविवारीही कर्मचाऱ्यांकडून काम
अकरावी बारावी नंतर महाविद्यालयात जात पडताळणी दाखले काढणेसाठी विविध शिबीर भरवली जातात. त्यामध्ये दाखल्यासाठी आवश्यक कागपदपञे दिली तर पुरेसा वेळ मिळतो. प्रवेशाच्या कालावधीत हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यामुळे कार्यालयावर ताण पडतो. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे शनिवार, रविवारीही त्यांना बोलवून दाखला त्वरीत देण्यासाठी कार्यालय प्रयत्नशील आहे. कोणाचेही नुकसान होउ नये कागदपञे दखल करून त्यांना पोहच पावती दिली जात आहे.
-भरत केंद्रे, उपायूक्त तथा सदस्य, जिल्हा जात पडताळणी समिती कोल्हापूर
- आता गरज भासली
अकरावीत दाखल्याची आवश्यकता वाटली नाही. आता व्यावासायिक शिक्षणासाठी जातीचा दाखला जोडला की फीमध्ये सवलत मिळते. त्यामुळे आता दाखल्याची आवश्यकता भासली.
-मारूती पाटील,विद्यार्थी
- दाखल्याची माहिती नव्हती
अकरावीत जातीचा दाखला काढतात त्याची माहिती नव्हती. आता व्यावसायिक शिक्षणासाठी जातीच्या दाखल्यासह वैद्य प्रमाणपञ याची आवश्यकता असल्यामुळे आलो आहे.
-एक विद्यार्थी
वैद्यकीय, अभियांञिकी, एम. बी.ए, एल.एल.बी, एम.एस.सी बीसीए, आदी व्यावसायिक शिक्षणाबरोबर एम फिल, पीएचडीसाठीचे विद्यार्थीही दाखल्यासाठी रांगेत उभे होते.