For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावात आजपासून सेकंड व्हिजन कर्नाटक-२०२६ प्रदर्शन

12:29 PM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगावात आजपासून सेकंड व्हिजन कर्नाटक २०२६ प्रदर्शन
Advertisement

खासदार जगदीश शेट्टर यांची पत्रकार परिषदेत माहिती : प्रदर्शन तीन दिवस चालणार

Advertisement

बेळगाव : गतवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीस्थित प्रयास एक्झिबिशनच्या माध्यमातून सेकंड व्हिजन कर्नाटक-2026 या तीन दिवशीय जनजागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन 23 ते 25 जून या कालावधीत केएलई येथील नेहरूनगर कन्व्हेंशन सेंटर, डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रयासचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गुप्ता यांनी सोमवारी हॉटेल सेंट्रल बँक्वेट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार जगदीश शेट्टर यांनी यावेळी केले.

सुरुवातीला खासदार जगदीश शेट्टर यांनी पत्रकार परिषदेत प्रदर्शनाची उद्दिष्टे, वैशिष्ट्यो आणि केंद्र, राज्य व बेळगावच्या विकासातील त्याची भूमिका स्पष्ट केली. गेल्या वर्षी सदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. व्हिजन कर्नाटक-2025 च्या उल्लेखनीय यशानंतर बेळगावसारख्या शहरात सलग दुसऱ्या वर्षी असे प्रदर्शन आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे प्रदर्शन जनतेसाठी विनामूल्य असून ते 23, 24 आणि 25 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 पर्यंत खुले राहील.  यामुळे नागरिकांना केंद्र सरकारची मंत्रालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, राज्य सरकारचे विभाग, संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

Advertisement

संरक्षण, कृषी, वित्त, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अवकाश, ग्रामीण विकास, एमएसएमई, पायाभूत सुविधा, पर्यावरण, शिक्षण आणि कौशल्य विकास यासारख्या विविध क्षेत्रांमधील तांत्रिक नवकल्पनांबद्दल जागृती वाढविणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. माहितीपूर्ण प्रदर्शने, संवादात्मक सादरीकरणे, थेट प्रात्यक्षिके आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे विविध सरकारी उपक्रम समजून घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. 24 जून रोजी ‘बेळगावचे भविष्य अॅट 2047’ या विषयावर भव्य चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व इतर पाहुणे यावेळी आपले विचार मांडणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत आयोजित ‘फ्युचर ऑफ बेळगाव-2047’ विशेष महाचर्चा होणार आहे. यावेळी व्यासपीठावर महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाली, माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील, सुभाष पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.