For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय संघाचा सलग दुसरा विजय

06:45 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय संघाचा सलग दुसरा विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ नोंथाबुरी (थायलंड)

Advertisement

येथे सुरु असलेल्या 2026 च्या सॅफ फुटसाल चॅम्पियनशिप पुरुषांच्या स्पर्धेत भारताने आपला सलग दुसरा विजय नोंदविताना श्रीलंकेचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला.

या सामन्यात नोंदविलेले सर्व गोल खेळाच्या पूर्वार्धात झाले. भारतातर्फे सिऑन डिसोझाने तिसऱ्या आणि 20 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. लालसेव्हामपुईयाने 10 व्या मिनिटाला तर निखिल माळीने 12 व्या मिनिटाला गोल केला. लंकेतर्फे एकमेव गोल मोहम्मद कुरुशितने 19 व्या मिनिटाला नोंदविला. या स्पर्धेतील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने भूतानचा 11-3 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला होता. आता या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत 5 सामन्यातून 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता भारताचा पुढील सामना सोमवारी पाकबरोबर होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.