महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मडगावात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

11:23 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रात्री उशिरा आंदोलन घेतले मागे: अन्यथा आज पुन्हा रास्तारोकोचा इशारा

Advertisement

मडगाव : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डीएनए’ चाचणी करावी अशी मागणी केल्याने ख्रिस्ती लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सुभाष वेलिंगकर यांना अटक करावी अशी मागणी करून ख्रिस्तीबांधव शनिवारी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले व त्यांनी रास्तारोको केला. हे आंदोलन रात्री उशिरा मागे घेण्यात आले. शनिवारी सकाळी सुरू झालेल्या आंदोलनामुळे विद्यार्थी, पालक तसेच पर्यटक यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना भर उन्हात पायपीट करावी लागली. सुभाष वेलिंगकर यांना अटक झाली नाही तर आज रविवारी पुन्हा कोलवा सर्कल जवळ सकाळी साडेदहा वाजता एकत्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

शुक्रवारी संध्याकाळी 4 वा. प्रतिमा कुतिन्हो यांनी मडगाव पोलीस स्थानकावर तक्रार नोंद करण्यासाठी आपण जाणार असल्याने सर्वांना यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. वेलिंगकर यांच्या विरोधात तक्रार नोंद केल्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी लावून धरली व रात्री उशिरापर्यंत मडगाव पोलीस स्थानकावर ठिय्या मारला. गुन्हा नोंद झाल्यानंतरही शनिवारी सकाळी ख्रिस्तीबांधवांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत मडगाव पोलीस मुख्यालयाबाहेर गर्दी केली व त्यांच्या अटकेची मागणी लावून धरली. त्यानंतर आंदोलक चालत कोलवा सर्कलपर्यंत गेले व त्यांनी रास्तारोको केला. वेलिंगकर यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनामुळे वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली. त्यात अडकलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागले.

सर्वसामान्य जनतेला धरले वेठीला

सकाळी हायस्कूल, कॉलेजमध्ये गेलेले विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच पर्यटक आणि इस्पितळात जाणाऱ्या लोकांची या आंदोलनामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावे लागले. आंदोलकांना विनंती करून ही त्यांनी रस्ता मोकळा केला नाही. त्यामुळे आंदोलक व वाहन चालक यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली.

एक दुचाकी स्वाराने रस्ता बंद असतानाही पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने, त्याला आंदोलकांनी रोखून धरले. त्याच्या डोक्यावरील हेल्मेट काढून घेतले व त्याच हेल्मेटने त्याला मारहाण करण्यात आली. एक व्यक्ती आपले वडील इस्पितळात दाखल असल्याने, त्याठिकाणी जाण्यासाठी निघाले होते. त्यांनाही रोखून धरण्यात आले. आपले वडिल इस्पितळात असल्याची कल्पना देऊन ही त्यांना सोडण्यात आले नाही. उलट ‘तुमचे वडील मरू देत’ असे शब्दही वापरण्यात आले.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत सुभाष वेलिंगकर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. राज्यभरात विविध पोलीस स्थानकांत ख्रिस्तीबांधवांनी तक्रार कऊनही गुन्हा दाखल न झाल्याने शुक्रवारी सायंकाळी दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला. यावेळी पोलीस मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा डिचोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर पोलिसांनी याची माहिती आंदोलकांना दिली. मात्र, त्यानंतरही रात्री एक वाजेपर्यंत काँग्रेसचे खासदार, आमदार, आपचे कार्यकर्ते कोलवा सर्कलवर थांबून आंदोलन करत होते.

फातोर्डा व मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात तक्रारी

सुभाष वेलिंगकर यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी फातोर्डा परिसरातील नागरिकांनी सकाळी पोलीस स्थानक गाठले. पोलिसांना निवेदन देत वेलिंगकर यांच्यावर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला असून पुढील कारवाई सुऊ असल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलन मडगाव पोलीस स्थानकात आले. याशिवाय राशोल, लोटली, कामुर्ली येथील नागरिकांनी एकत्र येत मायना कुडतरी पोलिसांत तक्रार नोंद केलेली आहे.

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

कोलवा सर्कलकडे आंदोलकांनी रस्ता बंद केल्यानंतर ज्या ठिकाणी शक्मय आहे, त्या मार्गाने पोलिसांनी वाहतूक वळवली. वाहतूक वळवण्यात येत असल्याचे दिसताच आंदोलकांनी सर्कलकडून मडगाव कदंब बसस्थानकापर्यंत येत त्याठिकाणी रास्तारोको केला. या आंदोलनात सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, वेळळीचे आमदार व्रुझ सिल्वा इत्यादी राजकीय नेते सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे चर्चा केली व सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी केली. वेलिंगकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला व त्यावर सुनावणी होऊन अंतरिम जामिन मंजूर झालेला नसल्याची कल्पना यावेळी उपस्थितांना दिली.

पोलिस, मामलेदारांचे समजावण्याचे प्रयत्न फोल

आंदोलकांनी मडगावातील बहुतांशी रस्ते बंद केल्यानंतर नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी आंदोलन म्हणाले की, फा. बोलमेक्स परेरा यांना त्वरित अटक केली जाते. तर वेलिंगकरांना का अटक केली जात नाही असा सवाल केला.  अधीक्षक सुनीता सावंत यांनी सांगितले की, वेलिंगकर याचा शोध सुऊ आहे त्यांच्यावर कारवाई होईल, पण आंदोलकांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. मामलेदार प्रताप गावकर यांनीही आंदोलकांशी चर्चा करताना नागरिकांना त्रास होत असून रस्ते खुले करण्याची मागणी केली. त्यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारला वेलिंगकरांना अटक करायला सांगा, दोन मिनिटात रस्ते खुले कऊ असे स्पष्ट केले.

हाताला मिळेल ती वस्तु टाकून रस्ते बंद केले

कोलवा सर्कलकडे सुऊ करण्यात आलेला रास्ता रोकोनंतर आंदोलकांनी कदंब बसस्थानकाकडे धाव घेतली. तसेच काहींनी रवींद्र भवन सर्कलकडील रस्ते बंद केले. प्रतिमा कुतिन्हो व वॉरेन आलेमाव यांनी कदंबच्या तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याला काम बंद करण्यास लावत प्रवाशांना जाण्यास सांगितले. बस लाकडे टाकून अडवण्यात आल्या. बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना याचा मोठा त्रास झाला.

पर्यटक, विद्यार्थी पायपीठ करावी लागली

कदंब बसस्थानकानजीक गाड्या अडवून ठेवण्यात आल्यानंतर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना बसमधून उतऊन पायी प्रवास करत पुढे जावे लागले. याशिवाय शाळा, महाविद्यायलये सुटल्यानंतर मुलांनाही पालकांच्या गाड्या पुढे येत नसल्याने पालकांपर्यंत पायी चालत जावे लागले. ज्यांच्याकडे मोबाइल नव्हते त्यांना आणखी त्रास सहन करावा लागला. खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही गाडी अडवून खाली उतरवण्याचे प्रकार घडले.

हतबल पोलिसांची बघ्याची भूमिका

आंदोलकांनी एकेक करत मडगाव परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यास सुऊवात केली. आंदोलकांनी पोलिस किंवा जिल्हा प्रशासनाची कोणतीही गोष्ट ऐकण्यास नकार दिला. राज्य सरकारकडूनही यावर तत्काळ निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सायंकाळपर्यंत नागरिकांना आंदोलकांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत पोलिसही हतबल झाल्याचे दिसून आले.

पोलीस लाठ्या घेऊन आले अन चित्र पालटले

अंादोलक काहीच ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. रस्ता मोकळा करण्यास तयार नव्हते. सर्वांनी कोलवा सर्कलजवळ ठिय्या मारला व रात्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी पोलिसांनी संभाव्य परिस्थिती ओळखून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पाचारण केला. पोलीस हातात लाठ्या घेऊन आल्यानंतर पोलिसांची पुढील कृती काय असेल याची कल्पना आल्यानंतर आंदोलकांनी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले. मात्र, यावेळी आज रविवारी सकाळपर्यंत जर वेलिंगकरांना अटक झाली नाही तर पुन्हा कोलवा सर्कलजवळ रास्तारोको करण्याचा इशारा दिला.

मिकी पाशेकोची पोलिसांच्या समक्षच धमकी

माजी आमदार मिकी पाशेको यांनी वेलिंगकर पोलिसांना सापडत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. जर आपल्याला सापडले तर त्यांच्या डोक्यावर गोळी झाडून त्यांना जीवंत मारणार असल्याची धमकी पोलिसांच्या समक्ष दिली.

भाषा आंदोलनाची पुनरावृती नको

भाषा आंदोलनाच्यावेळी अशाच प्रकारे मोठ्या संख्येने ख्रिस्ती लोक रस्त्यावर उतरले होते. सर्व रस्ते बंद केले होते. त्या आंदोलनात काही जणांचा बळी गेला होता. तशाच प्रकारे हे आंदोलन होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी शक्य तेवढ्या लवकर वेलिंगकर यांना अटक करावी व भाषा आंदोलनाची पुनरावृत्ती टाळावी अशी मागणी नेली रोड्रिग्स यांनी केली.

काही आंदोलकांना घेतले ताब्यात

आंदोलन मागे घेतले असल्याचे सांगितल्यानंतरही काही आंदोलक रस्ता मोकळा करण्यास तयार नव्हते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी रस्तारोको कायम ठेवला. त्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले होते.

जनतेला शांत राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

प्रा. सुभाष वेलिंगकर यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही. फादर बॉल मॅक्स यांना जशी कलमे लावण्यात आली होती तशाच पद्धतीची कलमे वेलिंगकर यांना देखील लागू होतील आणि सर्वांनाच समान न्याय राहील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी म्हटले आहे. मात्र हे निमित्त काढून कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न देखील करू नये याकरिताच ज्यांनी आंदोलन सुरू केले आहे त्यांनी ते मागे घ्यावे व कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले तसेच जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article