For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बारावी अनुत्तीर्णांसाठी दुसरी संधी

11:25 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
बारावी अनुत्तीर्णांसाठी दुसरी संधी
Advertisement

पीयुसी-2 परीक्षा सोमवारपासून : वेबकास्टिंगद्वारे बेंगळूरला प्रक्षेपण होणार

Advertisement

बेळगाव : बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व शिक्षण विभागाने दुसरी संधी दिली असून सोमवार दि. 29 पासून पीयुसी-2 परीक्षा घेतली जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात यावेळी विविध विषयांचे 14,510 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अकरा परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून शिक्षण विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. दीड महिन्यापूर्वी बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये काही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना दुसरी संधी दिली आहे. 29 एप्रिल ते 16 मे या दरम्यान पीयुसी-2 परीक्षा घेण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मंडळाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते. हॉलतिकीटही उपलब्ध झाले असून विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.

11 केंद्रांवर होणार परीक्षा

Advertisement

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 11 परीक्षा केंद्रांवर पीयुसी-2 परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये बेळगाव शहरात 6, रामदुर्ग 1, बैलहोंगल 2, सौंदत्ती 1, खानापूर 1 अशी परीक्षा केंद्रे असणार आहेत. 14,510 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे. परीक्षा सुरळीत पद्धतीने पार पडावी, यासाठी विभागीय मुख्याधिकारी, प्रश्नपत्रिका वाहक, भरारी पथक यासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

यावेळी होणार वेबकास्टिंगचा प्रयोग

या परीक्षेत वेबकास्टिंगचा प्रयोग पदवीपूर्व शिक्षण विभाग करणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसविले असून याचे प्रक्षेपण थेट बेंगळूर येथील पदवीपूर्व परीक्षा विभाग कार्यालयात दाखविले जाणार आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पंचायत कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारला जाणार आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही

बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणार आहे. सोमवार दि. 29 पासून परीक्षेला सुरुवात होत असून यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले असून त्याचे वेबकास्टिंगद्वारे बेंगळूरला प्रक्षेपण होणार आहे.

-एम. एम. कांबळे, पदवीपूर्व शिक्षणाधिकारी

Advertisement
Tags :

.