शाईन ब्राईट एज्युकेशन सर्व्हिसेसची दुसरी बॅच रशियाकडे रवाना
प्रतिनिधी/ बेळगाव
शाईन ब्राईट एज्युकेशन सर्व्हिसेसतर्फे दुसरी बॅच रशियातील ओम्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी रवाना झाली आहे. या बॅचमधील विद्यार्थी बेळगाव शहर तसेच खानापूर, अथणी, जमखंडी, जत या तालुक्यांसह मुंबई व ठाणे येथील आहेत.
याप्रसंगी शाईन ब्राईट एज्युकेशन सर्व्हिसेसचे संचालक डॉ. सूरज अनगोळकर म्हणाले की, विद्यार्थ्यांची दुसरी बॅच रशियात उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी जात असून ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रामाणिकपणे मार्गदर्शन, सल्ला देणे व साहाय्य करणे हे आमचे ध्येय आहे.
शाईन ब्राईट एज्युकेशन सर्व्हिसेसने आम्हाला प्रामाणिकपणे व स्पष्ट मार्गदर्शन केले. प्रवेशापासून व्हिसापर्यंत सर्व काही सुलभपणे व विश्वासार्हपूर्ण मिळाले, असे विजय पाटील (खानापूर) म्हणाले.
मुलांना परदेशात पाठविणे ही प्रत्येक पालकासाठी भावनिक वेळ असते. पण शाईन ब्राईट टीमने आम्हाला आत्मविश्वास दिला. त्यांचा दृष्टिकोन निश्चितच प्रशंसनीय आहे, असे माजी सैनिक पुन्नाप्पा बेळगावकर (गणेशपूर) म्हणाले. त्यानंतर पालकांनी शाईन ब्राईट टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्व विद्यार्थ्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून पालक व शाईन ब्राईट टीमने शुभेच्छांसह निरोप दिला.
ओम्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी हे रशियातील एक प्रतिष्ठित सरकारी वैद्यकीय विद्यापीठ असून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी प्राध्यापक व इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरले आहे. ‘तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विश्वासार्ह मार्गदर्शक’ असे ब्रिदवाक्य घेऊन शाईन ब्राईट कार्य करीत आहे. अधिक माहितीसाठी 9019949143 किंवा 6362847443 वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.