‘ओला ईव्ही’ला सेबीचा इशारा
कंपनीकडून डिस्क्लोजर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप
नवी दिल्ली :
भारतीय सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज बोर्ड (बोर्ड) यांच्याकडून इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी ओला यांना आपल्या एक्सपान्शन प्लॅनची घोषणा करण्यासह अन्य घटकांवर आक्षेप घेत सेबीने फटकारले आहे. एक्सचेंज फायलिंग नुसार 7 जानेवारी रोजी सेबीने लिस्टिंग ऑब्लिगेशन अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट रेग्युलेशन 2025 सह अन्य कलमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सेबीने कारवाई करण्याचा इशारा ईमेलच्या माध्यमातून दिला आहे.
दरम्यान 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियाच्या एक्स खात्यावर एक व्हीडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कंपनी 20 डिसेंबरपर्यंत आपल्या सेल्स नेटवर्कची संख्या चारपट वाढविण्याची घोषणा केली होती. तसेच मुंबई शेअरबाजार व राष्ट्रीय शेअर बाजार यांनाही या संदर्भात माहिती दिली होती.
सुधारणा कराव्यात : सेबी
सेबीने इशारावजा दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वरील नियमांचे उल्लंन केल्याच्या गंभीर गोष्टींवर भविष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी सुधारणा करुन आपल्या कंप्लायंस स्टॅण्डर्समध्ये सुधारणा करण्याच्या सूचना सेबीने यावेळी दिल्या आहेत.
ओलाचे समभाग घसरले
ओला इलेक्ट्रिकचे समभाग 1.51 टक्क्यांनी घसरणीसह 77.94 रुपयांवर ट्रेडिंग करत होते. मागील एक महिन्यात या समभागांनी 15.23 टक्क्यांचा नकारात्मक परतावा दिल्याची नोंद आहे. ओला ईव्हीचे समभाग 9 ऑगस्ट रोजी सुचीबद्ध झाले होते.