For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेबीकडून 5,000 पेक्षा अधिकच्या तक्रारींचा निपटारा

07:00 AM Jul 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
सेबीकडून 5 000 पेक्षा अधिकच्या तक्रारींचा निपटारा
Advertisement

जून 2026 मधील आकडेवारी : यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ होणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाने (सेबी) आपल्या स्कोअर्स 2.0 प्लॅटफॉर्मने या ऑनलाइन तक्रार निवारण प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. जून महिन्याच्या आकडेवारीनुसार, सेबीने 5,000 हून अधिक तक्रारी यशस्वीरित्या निकाली काढल्या आहेत. यामुळे बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ झाला आहे. सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात स्कोअर्स प्लॅटफॉर्मवर एकूण 5,035 नवीन तक्रारी नोंदवण्यात आल्या, तर याच कालावधीत 5,037 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. यामुळे, जून अखेरपर्यंत तक्रारींची संख्या 5,537 वरून 5,524 पर्यंत कमी झाली आहे.

Advertisement

तथापि, आदित्य बिर्ला मनी लिमिटेड, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि एचबीएल पॉवर सिस्टम्स यांसारख्या काही कंपन्यांविरुद्धच्या 17 तक्रारी अजूनही तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत. सेबीच्या अहवालानुसार, तक्रारींच्या निवारणाच्या गतीमध्ये सुधारणा झाली आहे. जूनमध्ये कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या तक्रारींवर ‘केलेल्या कारवाईचा अहवाल’  सादर करण्यासाठी सरासरी फक्त 4 दिवस घेतले. त्याच वेळी, ज्या प्रकरणांचा पहिल्यांदाच आढावा घेण्यात आला, ती सोडवण्यासाठी सरासरी 8 दिवस लागले.

Advertisement
Tags :

.