For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एलटीसीजी कर हटविण्याची सेबीची सरकारकडे शिफारस

06:46 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
एलटीसीजी कर हटविण्याची सेबीची सरकारकडे शिफारस
Advertisement

विदेशी गुंतवणुकदार व म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था/ दिल्ली :

शेअर बाजारातील नियामक संस्था सेबीने विदेशी गुंतवणुकदारांवर लावण्यात येणारा लाँगटर्म कॅपिटल गेन टॅक्स (एलटीसीजी) मागे घेण्यात यावा, अशा प्रकारची शिफारस सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनाही करामधून मुक्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याअंतर्गत एका म्युच्युअल फंड योजनेमधून दुसऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक स्थलांतिरत करताना त्यावर एलटीसीजी करामध्ये सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे. एक वर्षापेक्षा अधिक काळ आपल्यासोबत युनिट ठेवणाऱ्या गुंतवणुकदारांसाठीच ही सवलत असावी, अशीही शिफारस करण्यात आली आहे.

Advertisement

गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजाराचे प्रदर्शन इतर देशांच्या शेअरबाजारांमध्ये कमकुवत दिसून आले आहे. यावर्षी पाहता विदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारात विक्रमी 31 अब्ज डॉलर्सच्या समभागांची विक्री केली आहे. या सोबतच शेअरबाजारात समभागांच्या माध्यमातून मिळणारा परतावासुद्धा नकारात्मक राहिला आहे. यामुळे गुंतवणुकदारांनी विदेशांमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये रस घेतला होता. एलटीसीजी कर हटविण्यासंदर्भातील प्रस्ताव सेबीने गेल्या दोन वर्षातील बाजाराची स्थिती लक्षात घेऊन सरकारसमोर ठेवला आहे. यापूर्वी विदेशी गुंतवणुकदारांसोबत विविध बैठका घेण्यात आल्याचे सेबीने म्हटले आहे. विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने भारतामधील गुंतवणुकीवर लावण्यात येणाऱ्या कर कमी करण्याबाबत सूचना करण्यात आली होती.

 किती आहे टॅक्स

सेबीच्या म्हणण्यानुसार, भारतामधील समभागांमध्ये गुंतवणुकीसंदर्भातील व्यवहाराचा खर्च हा जगातील इतर बाजारांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. सध्याच्या गुंतवणुकदारांना एक वर्षापेक्षा अधिक गुंतवणूक केलेल्यांना 12.5 टक्के एलटीसीजी कर भरावा लागतो. एक वर्षांपेक्षा कमी गुंतवणूक करणाऱ्यांना 20 टक्के इतका शॉर्टटर्म कॅपिटल गेन टॅक्स (एसटीसीजी) कर भरावा लागतो.

यासोबतच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनाही करामध्ये सवलत देण्याची मागणी सेबीने सरकारकडे केलेली आहे. भारताचा प्रमुख बेंचमार्क निर्देशांक निफ्टी-50 गेल्या 2 वर्षात 4.8 टक्के इतका घसरला आहे. गुंतवणूकदारांनी देशांतर्गत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरुच ठेवावी, याकरिता त्यांच्यासाठीच्या करात सवलत द्यावी अशी शिफारस करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.