For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

3 कंपन्यांच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदील

06:19 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
3 कंपन्यांच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदील
Advertisement

टोरेंट गॅस, सत्या एजन्सी, कनोहर इलेक्ट्रिकल्सचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

शेअर बाजारातील नियामक सेबी यांनी तीन कंपन्यांच्या आयपीओंना हिरवा कंदील दाखवला आहे. यामध्ये टोरेंट गॅस, सत्या एजन्सी आणि कनोहर इलेक्ट्रिकल्स यांचा समावेश आहे.

Advertisement

टोरेंट गॅस- यामध्ये पाहता टोरेंट गॅस यांनी मात्र कॉन्फिडेन्शिअल फायलिंग (गोपनीयरित्या) सेबीकडे दाखल केल्याचे समजते. शहर गॅस वितरण कंपनी टोरेंट गॅस यांनी मार्च 2026 मध्ये सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स जमा केले होते. कंपनीने यावेळी कॉन्फिडेन्शिअल फायलिंगद्वारे अर्ज सादर केला आहे. 25 जून रोजी सेबीने यासाठी मंजुरी दिली आहे. या पर्यायाद्वारे अर्ज केल्यानंतर कंपनी आपल्या आयपीओचा आकार आणि इतर महत्त्वाची माहिती सार्वजनिक करू शकणार नाही. याचा फायदा कंपनीला हा होईल की, बाजारातील स्थिती लक्षात घेऊन आपली रणनीती निश्चित करणे शक्य होईल. सध्याला 526 सीएनजी स्टेशन्स कंपनी चालवत असून 34 जिह्यांमध्ये दोन लाखाहून अधिक घरांमध्ये पाईपड् नॅचरल गॅस (पीएनजी)चा पुरवठा करते आहे.

सत्या एजन्सी- सत्या एजन्सी ही कंपनी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक रिटेल चेन क्षेत्रातली असून आयपीओ अंतर्गत सहाशे कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. सत्या एजन्सीने 30 मार्च 2026 रोजी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्ससह अर्ज दाखल केला होता. सेबीने 25 जूनला या संदर्भात मंजुरी दिली असून तीनशे कोटी रुपयांचे ताजे समभाग आणि 300 कोटी रुपये ऑफर फॉर सेलअंतर्गत उभारणार असल्याचे समजते. आयपीओअंतर्गत प्रवर्तक जॉन्सन असारिया, जे जॉन सत्या आणि चार्लस पाकीराज हे प्रत्येकी 100 कोटी रुपयांचे समभाग विक्री करणार आहेत. ताज्या समभागाच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेचा वापर कंपनी आपल्या कामकाजासाठी करणार आहे व त्यासोबत डोक्यावरचे कर्जही कमी करणार आहे.

कनोहर इलेक्ट्रिकल्स- यांचा आयपीओ येणार असून 27 जानेवारी 2026 रोजी आयपीओ करता कंपनीने अर्ज केला होता. 22 जूनला सेबीने या संदर्भात मंजुरी दिली आहे. सदरच्या कंपनीचा आयपीओ दोन गटांमध्ये सामील होणार आहे. पहिल्या गटामध्ये 300 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर केले जाणार असून दुसऱ्या गटात प्रवर्तक के सन्स फॅमिली ट्रस्ट यांच्यामार्फत 1.45 कोटी समभाग ऑफर फॉर सेलअंतर्गत सादर केले जातील. उभारलेल्या रकमेचा वापर कंपनीच्या व्यवसाय विस्तारासाठी केला जाणार असून तसेच मशीन खरेदी, उत्पादन क्षमता वाढवणे, ऑटोमेशन, सोलर पॉवर प्लांट निर्मिती आणि इलेक्ट्रिकल व्हेइकल खरेदीसाठी वापरली जाणार आहे. याशिवाय शिल्लक राहिलेली रक्कम ही कामकाजी भांडवलासाठी वापरली जाईल.

कॉन्फिडेन्शियल आयपीओ फायलिंग म्हणजे काय ?

जेव्हा एखादी कंपनी आयपीओ आणण्याची तयारी करते तेव्हा कंपनीला सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस अर्थात डीआरएचपी अर्ज जमा करावा लागतो. साधारणपणे पाहता या अर्जासंदर्भातली कागदपत्रे ही सार्वजनिक केली जात असतात. यामध्ये कंपनीचा व्यवसाय, सध्याची आर्थिक स्थिती, जोखीम स्थिती, स्पर्धात्मक स्थिती त्याचप्रमाणे भविष्यातील योजनांची काही माहिती उघड केली जात असते. या विरुद्ध कॉन्फिडेन्शियल फायलिंगमध्ये पाहता कंपनीची माहिती सार्वजनिक केली जात नाही. सेबी या माहितीचा पूर्णपणे अभ्यास करते आणि आपल्या सूचना देते. यानंतरच कंपनी आपला आयपीओ लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार होते. कॉन्फिडेन्शियल फायलिंग केल्याने व्यवसायाची रणनीती आणि संवेदनशील माहिती सुरुवातीच्या काळात प्रतिस्पर्धी कंपन्यांपर्यंत पोहोचत नाही.

Advertisement
Tags :

.