एनएसईच्या आयपीओला सेबीची मंजुरी
30 हजार कोटी उभारण्याची तयारी : 15 सप्टेंबरला खुला होऊ शकतो आयपीओ
वृत्तसंस्था, मुंबई
देशातील सर्वात मोठा आयपीओ म्हणून तुलना होणाऱ्या एनएसई यांचा आयपीओ सादरीकरण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या आयपीओला बाजारातील नियामक सेबी यांनी अखेर मंजुरी दिली आहे. सदरच्या आयपीओतून जवळपास 30 हजार कोटी रुपयांची उभारणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एनएसईचा आयपीओ 15 सप्टेंबरला खुला होऊ शकतो. सेबीने दीर्घकाळानंतर एनएसईच्या आयपीओला हिरवा कंदील दाखवला आहे. बाजारात सर्वाधिक रक्कम उभारण्यात एनएसईचा आयपीओ यशस्वी होईल अशी आशा आहे. या आठवड्यात इशु किमतीचा खुलासा होऊ शकतो व 15 सप्टेंबरला आयपीओ खुला होऊ शकतो. तसेच शेअरबाजारात 25 सप्टेंबरपर्यंत सुचीबद्ध होण्याचे संकेतही दिले जात आहेत.
सर्वाधिक मूल्याचा आयपीओ
या आयपीओत 1 रुपये फेसव्हॅल्युचे 14.89 कोटी पर्यंत इक्विटी समभाग सादर पेले जातील. उभारलेली रक्कम समभाग विक्री करणाऱ्या समभागधारकांना मिळणार असल्याचे समजते. या आयपीओतून 30 हजार कोटी रुपयांची उभारणी होऊ शकते. तसे झाल्यास देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या मुल्याचा हा आयपीओ ठरु शकतो. ह्युंडाईने 2024 मध्ये आणलेल्या आयपीओतून जवळपास 28 हजार कोटी रुपये उभारले होते.
समभाग विक्री करणाऱ्यांमध्ये एसबीआय, एसबीआय कॅपिटल, एमएस स्टॅटजिक(मॉरीशस), कॅनडा पेन्शन प्लॅन इन्वेस्टमेंट बोर्ड, अरंडा इन्वेस्टमेंटस, बँक ऑफ बडोदा, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नॅशनल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांचा समावेश असणार आहे.