‘मीशो’ला आयपीओसाठी सेबीची मान्यता
आयपीओमधून 4,221 कोटी रुपये उभारणार
वृत्तसंस्था/ मुंबई
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोला त्यांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) साठी सेबीकडून मान्यता मिळाली आहे. मीशोने आयपीओसाठी त्यांचे अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (यूडीआरएचपी) सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीकडे दाखल केले आहे.
मीशो किती पैसे गोळा करेल?
मीशो नवीन शेअर्स जारी करून सुमारे 480 दशलक्ष डॉलर (रु. 4,221 कोटी) उभारणार आहे. याशिवाय, ऑफर फॉर सेल (ओएफएस) मध्ये 300 दशलक्ष डॉलर(रु. 2,638 कोटी) किमतीचे शेअर्स विकले जाणार आहेत. याच वेळी, आयपीओचा एकूण आकार 800 दशलक्ष डॉलर्स (रु. 7,036 कोटी) असेल. कंपनी या निधीचा वापर तंत्रज्ञान अपग्रेडेशन, ब्रँड बिल्डिंग आणि सामान्य कॉर्पोरेट खर्चासाठी करेल.
मीशोला 70,360 कोटी मूल्यांकनाची अपेक्षा आहे बुक बिल्डिंग प्रक्रियेला 30-45 दिवस लागतील, त्यानंतर आयपीओ लाँच केला जाईल आणि मूल्यांकन अंतिम केले जाईल. परंतु कंपन्या सामान्यत: आयपीओमध्ये 10 टक्के हिस्सा विकतात, ज्यामुळे मूल्यांकन सुमारे 8 अब्ज डॉलर (70,360 कोटी रुपये) असण्याची अपेक्षा आहे.