5 कंपन्यांना सेबीने दिली आयपीओसाठी मंजुरी
07:00 AM Oct 31, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : शेअर बाजारातील नियामक सेबीने पाच कंपन्यांना आयपीओ सादर करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये मिल्की मिस्ट डेरी फूड, क्युअर फुड्स इंडिया, गजा अल्टरनेटिव्ह असेट मॅनेजमेंट, कनोडीया सिमेंट आणि स्टीम हाऊस इंडिया यांना आयपीओ सादरीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. भारतामध्ये सर्वात वेगाने वाढणारी पॅकेज फूड कंपनी मिल्की मिस्ट डेरी फूड आपल्या आयपीओमार्फत 2035 कोटी रुपये उभारणार आहे. सेबीने त्यांच्या आयपीओला अंतिम मंजुरी दिली आहे. डेरी उद्योगामध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ मानला जात आहे. या अंतर्गत कंपनी 1785 कोटी रुपयांचे नवे ताजे समभाग सादर करणार असून प्रवर्तक सतीश कुमार टी आणि अनिता एस 250 कोटी रुपयांचे समभाग विक्रीसाठी सादर करणार आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article