For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मागील सीटवर ‘सीट बेल्ट रिमाइंडर’ फिचर्स द्यावे लागणार

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मागील सीटवर ‘सीट बेल्ट रिमाइंडर’ फिचर्स द्यावे लागणार
Advertisement

सर्व कार निर्मिती कंपन्यांनी ही सुविधा देणे आवश्यक : 1 एप्रिल 2025 पासून नियम अनिवार्य

Advertisement

नवी दिल्ली : वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आता सर्व कारमध्ये मागील सीटवर ‘सीट बेल्ट रिमाइंडर’ फीचर देणे आवश्यक आहे. कारण, 1 एप्रिल 2025 पासून देशात विकल्या जाणाऱ्या सर्व कारमध्ये ‘रिअर सीट बेल्ट अलार्म’ लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षेशी संबंधित या नियमाची कंपन्यांना सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एनएचएआय) या वर्षी मार्चमध्ये मसुदा जारी केला होता आणि नवीन नियमांवर सामान्य लोकांकडून मते मागवली होती.

1 एप्रिल 2026 पासून बसकरीता नियम

Advertisement

हा नियम 1 एप्रिल 2025 नंतर बनवलेल्या सर्व प्रवासी गाड्यांना लागू होईल,   अशी माहिती एका अहवालातून दिली आहे. यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमात सुधारणा करण्यात येणार आहेत. या अंतर्गत सीट बेल्ट, रेस्ट्रेंट सिस्टीम आणि सीट बेल्ट रिमाइंडर वापरणे आवश्यक आहे. 1 एप्रिल 2026 पासून बसेस आणि इतर अवजड वाहनांमध्ये सेफ्टी सीट बेल्ट जोडण्याचा नियम लागू केला जाईल.

सीट बेल्टचा फायदा

सीट बेल्ट अलार्म आवश्यक आहे. हे सुरक्षा वैशिष्ट्या कारमध्ये बसलेल्या प्रवाशाला सीट बेल्ट बांधण्यासाठी बीप आवाजाने अलार्म देते आणि जोपर्यंत प्रवासी सीट बेल्ट बांधत नाही तोपर्यंत हा अलार्मचा आवाज थांबत नाही. हे अपघातादरम्यान प्रवाशाला इजा होण्यापासून वाचवते.

नियम उल्लंघनांवर 1000 रुपये दंड

सीट बेल्ट न लावणाऱ्या मागील सीटच्या प्रवाशांना केंद्रीय मोटार वाहन नियम (सीएमव्हीआर) च्या नियम 138 (3) अंतर्गत 1,000 दंड आकारला जातो.

सायरस मिस्त्रीच्या निधनानंतर सरकारच्या हालचाली

उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर सरकार जागे झाले आहे. यापूर्वी, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्राr यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर मंत्रालयाने कारमध्ये तीन सुरक्षा वैशिष्ट्यो अनिवार्य करण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली होती. त्यात कंपनीने बसवलेले सीट बेल्ट, सीट बेल्ट अलार्म आणि कारमध्ये 6 एअरबॅग्ज देण्याचा प्रस्ताव आहे.

Advertisement
Tags :

.