डेटिंग अॅपवर जोडीदार नव्हे जॉबचा शोध
चीनमध्ये बदलत्या जॉब मार्केटदरम्यान युवा आता नोकरी मिळविण्यासाठी नव्या आणि अनोख्या पद्धती अवलंबित आहेत. पारंपरिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सच्या कमतरतेमुळे आता डेटिंग अॅप्सनला प्रोफेशनल कनेक्शन निर्माण करण्यासाठी वापरले जात आहे. प्रोफेशनल नेटवर्किंग आणि डेटिंगदरम्यानचे अंतर आता कमी होत चालले आहे. लिंक्डइनने 2021 मध्ये चीनमधील स्वत:चे स्थानिक अॅप बंद केले होते आणि 2023 मये इनकरियर देखील बंद झाले. यानंतर युवांकडे नेटवर्किंगसाठी मर्यादित पर्याय राहिले.
अशा स्थितीत अनेक लोक टिंडर, बम्बल आणि फेसबुक डेटिंग यासारख्या डेटिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत प्रोफेशनल कनेक्शन निर्माण करू पाहत आहेत. एका महिलेने डेटिंग अॅपवर एका व्यक्तीशी मॅच पेले. दोघांदरम्यान पर्सनल कनेक्शन निर्माण होऊ शकले नाही, परंतु त्या व्यक्तीने तिला स्वत:च्या कंपनीत रेफर पेले, ज्यामुळे तिला नोकरी मिळाली.
डेटिंग अॅपवर संभाषण सुरु करणे सोपे असते, कारण तेथे लोक अधिक शालीनपणे उत्तरं देतात असे काही युजर्सचे सांगणे आहे. तर एका एचआर अधिकाऱ्याने डेटिंग अॅपद्वारे एका उमेदवाराशी संपर्क साधला, परंतु त्याला नोकरी मिळाली नाही, पण दोघांदरम्यान मैत्री झाली.
डेट शोधणे, रिज्यूमे स्क्रीन करण्यासारखे
हा ट्रेंड प्लॅटफॉर्म डिझाइनमध्येही दिसून येतोय. 2024 मध्ये बॉस झीपिनने स्वत:चे प्लॅटफॉर्म कनझुआनला डेटिंग-स्टाइलमध्ये सादर केले आणि याची टॅगलाइन ‘डेट शोधणे, रिझ्यूमे स्क्रीन करण्यासाखे आहे’ अशी ठेवली.
डेटिंग अॅप्सचा असा वापर
अशाप्रकारच्या वापराची कक्षा वाढत आहे. 2025 मध्ये रेज्यूमे बिल्डरकडुन करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात दर तीनपैकी एका युजरने डेटिंग अॅप्सचा वापर प्रोफेशनल कारणांसाठी केल्याचे समोर आले. यातील 63 टक्के लोक नेटवर्क वाढविणे, 42 टक्के रेफरल मिळविणे आणि 40 टक्के नोकरी शोधण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. परंतु ही नवी पद्धत आणखी रंजक आहे. परंतु याच्यासोबत काही चिंताही जोडलेल्या आहेत. अनेक प्लॅटफॉर्म्स याला स्वत:च्या नियमांच्या विरोधात मानतात आणि पारदर्शकतेवरून प्रश्नही उपस्थित होत आहेत.