For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीलंकेत सामूहिक दफनभूमीत शोधकार्य

06:48 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्रीलंकेत सामूहिक दफनभूमीत शोधकार्य
Advertisement

आतापर्यंत मिळाले 240 सांगाडे

Advertisement

वृत्तसंस्था, जाफना

श्रीलंकेच्या जाफनाच्या बाहेरील भाग चेम्मानीमध्ये सामूहिक दफनभूमीत शोध घेण्याचे कार्य पुन्हा सुरू होणार आहे. न्यायालयाने हे काम पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला आहे. 7 महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया रोखण्यात आली होती. मागील वर्षी 45 दिवसांपर्यंत सामूहिक थडग्यांच्या खोदकामात 240 सांगाडे मिळाले होते. तसेच तेथून हाडांचे 14 मोठे ढिग, लहान मुलांना दूध पाजविण्यासाठीच्या बाटल्या, खेळणी व मुलांच्या बॅग्ज यासारख्या गोष्टी मिळाल्या होत्या. कथित स्वरुपात हे अवशेष 80 आणि 90 च्या दशकात श्रीलंकेच्या गृहयुद्धादरम्यान ठार करण्यात आलेल्या लोकांचे आहेत.

Advertisement

चेम्मानीमध्ये सामूहिक दफनभूमीचे हे ठिकाण सर्वप्रथम 1990 च्या दशकात एलटीटीई संघर्षादरम्यान चर्चेत आले होते. मागील वर्षी याचे खोदकाम रोखल्यावर न्यायालयाने आता हस्तक्षेप केला आहे.

विदेशी प्रतिनिधींची उपस्थिती

न्यायालयाने फ्रान्स, जर्मनी, इटली आणि रोमानियाच्या राजनयिक प्रतिनिधींना संबंधित ठिकाणी निरीक्षणासाठी उपस्थित राहण्यास अनुमती दिली. चेम्मानीमध्ये 13 फेब्रुवारी 2025 रोजी विकासकामांदरम्यान सांगाडे मिळाले होते. तर मागील वर्षी 15 मे रोजी न्यायालयाच्या देखरेखीत शोधकार्य सुरू झाल्यावर ते काही काळानंतर रोखण्यात आले होते. आता पुन्हा खोदकाम सुरू होणार असल्याने नवे खुलासे होऊ शकतात.

मृत्यूचे कारण

मारले गेलेल्या लोकांची ओळख, मृत्यूचे कारण आणि कालावधीची स्थिती स्पष्ट नाही. श्रीलंकेच्या गृहयुद्धादरम्यान बेपत्ता झालेले हे नागरिक असू शकतात, असे अनेकांचे मानणे आहे. हे गृहयुद्ध 1983 साली सैन्य आणि तमिळ बंडखोरांदरम्यान सुरू झाले होते. श्रीलंकेचे सैन्य चेम्मानी भागात एक दशकांपर्यंत मोठ्या संख्येत तैनात राहिले होते. चेम्मानीला जाफना शहराचे प्रवेशद्वार मानले जाते.

Advertisement
Tags :

.