कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीलंकेच्या विमानतळावर संशयितांचा शोध

06:22 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताकडून इनपूट्स मिळाल्यानंतर मोहीम : पहलगाम हल्ल्याचा संदर्भ

Advertisement

► वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित महत्त्वाच्या माहितीनंतर शनिवारी श्रीलंकेच्या बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी शोधमोहीम राबविण्यात आली. भारतीय यंत्रणांकडून अलर्ट मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याशी संबंधित 6 संशयित दहशतवादी चेन्नईमधून विमानाने श्रीलंकेत पोहोचणार असल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर ही मोहीम हाती घेतल्याचे श्रीलंकेच्या पोलिसांनी सांगितले.

भारताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीलंकन एअरलाईन्सच्या विमानांचीही कसून तपासणी करण्यात आली. श्रीलंकेचे पोलीस, हवाई दल आणि विमानतळ सुरक्षा दलांनी संयुक्तपणे विमानतळ परिसरात शोधमोहीम सुरू केली. सर्व प्रवाशांची कसून तपासणी केली जात असून संशयितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article