For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इएसआय हॉस्पिटल स्थलांतरासाठी शोधाशोध

11:02 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
इएसआय हॉस्पिटल स्थलांतरासाठी शोधाशोध
Advertisement

स्थलांतरानंतरच नवीन इमारतीच्या कामाला चालना : केंद्राकडून 100 खाटाच्या हॉस्पिटलसाठी 150 कोटी निधी मंजूर

Advertisement

बेळगाव : इएसआय हॉस्पिटलची इमारत जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर हॉस्पिटलचे इतरत्र स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी इमारतीची शोधाशोध करण्यात येत आहे. इमारत उपलब्ध झाल्यानंतरच सदर हॉस्पिटलचे स्तलांतर होणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. अशोकनगर येथे असणाऱ्या इएसआय हॉस्पिटलची इमारतीची पार दुरवस्था झाली आहे. तसेच रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णालय असून नसल्यासारखेच झाल आहे. यासाठी  रुग्णालयाची इमारत जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारणार आहे. यासाठी केंद्रांकडून 100 खाटाच्या हॉस्पिटलसाठी 150 कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच इमारत कामाला गती मिळणार आहे. मात्र तत्पूर्वी सध्या असणाऱ्या हॉस्पिटलसाठी इमारत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारकडून भाडेतत्त्वावर हॉस्पिटलसाठी इमारत घेण्याकरिता निविदा मागविली आहे.

अद्ययावत हॉस्पिटल उभारल्यानंतरच रुग्णांना सुविधा

Advertisement

पाच जणांकडून निविदा दाखल करण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. निविदा दाखल केलेल्यांकडून इमारतीच्या भाडे ठरविण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असून दर निश्चित झाल्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतरच हॉस्पिटलचे स्थलांतर होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. इएसआय हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र सुविधांभावी रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये उपचार करून घ्यावे लागत आहेत. यामुळे रुग्णांना कागदोपत्रांसाठी इएसआय हॉस्पिटलकडे धाव घ्यावी लागत आहे. अद्ययावत हॉस्पिटल उभारल्यानंतरच ईएसआय कार्डधारक रुग्णांना सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.