कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सील खडीक्रशर बेकायदा पुन्हा सुरू

04:57 PM Mar 15, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

म्हसवड :

Advertisement

महाराष्ट्रात एकमेव माण असा तालुका आहे त्याठिकाणी आजही आठ ते दहा दिवस साठवून ठेवलेले पिण्याचे पाणी पितात. शेतीच्या पाण्याचा तर पत्ता नसल्याने माणच्या ओसाड माळरानावर जिकडे पहावे तिकडे भकास, कुसळे उगवलेले बटलेली झाडे. सावलीसाठी व घोटभर पाण्यासाठी बन बन फिरणारी जनावरे अशा या माण तालुक्यात मात्र एकीकडे शिक्षणाने अतिउच्च शिखर आठले आहे तर दुसरीकडे आठ ते नऊ महिने कोरडी राहणारी एकमेव माणगंगा नदीच्या बाळू चोरी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनेकवेळा केंद्रबिंदू ठरला. चार अधिवेशने गाजवलेली माणची बाळू, गाळ माती, सिल खडी क्रशरची पुन्हा सुरू झालेल्या घरघरीत अब्जावधी रुपयाच्या महसूलला नक्की केराची टोपली दाखवतंय कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Advertisement

तिन वर्षापूर्वी माण तहसील कार्यालयात परिविक्षाधीन अधिकारी म्हणून काही महिने हजर झालेल्या रिचर्ड यानथन यांनी तालुक्यातील अवैध महसूलच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्यांचा शोध घेत तालुक्यात १४ अवैध खडी क्रशर बेकायदेशीरपणे सुरू आहेत. त्या खडी क्रशर मशनरी सिल करून खडी क्रशर चालकांवर दंडात्मक कारवाईचा आसूड उगारून पर्यवरणाचा व महसूलच्या गौण खनिज मालमत्तेचे लाखो रुपयेचे नुकसान भरपाईच्या नोटीसा काढल्या होत्या. मात्र खडी क्रशर मालक व महसूल विभागाचे अधिकारी आणि तालुक्यातील मुरब्बी राजकारणाच्या वशिलेबाजीमुळे दंडाच्या रकमा भरल्या तर नाहीतच पण त्या वसूल करुन महसूलात भर न करता खडीक्रशर मालकांना महसूल मधील अधिकारी यांना हाताशी धरुन गेल्या दोन वर्षापासून सिल केलेले खडी क्रशर मालकांनी महसूल शिवाय सिल उघडून राजकीय बजन वापरुन विजवितरण मंडळाकडून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर खडी क्रशर ठिकाणी घेऊन विज कनेक्शन देण्यात येवून सिल असलेल्या खडी क्रशरची घर घर दिवस रात्रीचा खडीक्रशर मालकांचा खेळ सुरू आहे. या खेळा मागील विज अभियंत्या बरोबर महसूल विभागाचा तो कोण माण मधील अधिकारी आहे खडी क्रशर सुरु करण्यास परवानगी नसताना सिल केलेला दंड न भरता खडी क्रशर सुरु कसे प्रांताधिकारी तहसीलदार विभागा जिल्हाधिकारी यांच्या सुचना व आदेशाला केराची टोपली दाखवून विना परवाना बाळू चोरी, शेती लगतची बाळू विक्री, तलावातील गाळ माती शेतात टाकण्याच्या नावावर वीटभट्टीवर टाकून शेतकरी बांधवास ठेंगा दाखवणारे माण तालुक्यातील महसूल विभागाचा माण तालुक्यात फक्त ठ हाम करे सौ कायदा ठ, कोणाचा बरहस्त तालुक्यात सर्वत्र बाळू चोरी, माती चोरी, सिल केलेले खडी क्रेशरला परवान्या मागील झारीतील शुक्राचार्य कोण ?

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article