सीगल इंडियाचा समभाग 419 वर सुचीबद्ध
इश्यूची किंमत 401 वर : कंपनी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात कार्यरत
वृत्तसंस्था /मुंबई
सीगल इंडिया लिमिटेडचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील इश्यू किमतीच्या तुलनेत 4.5 टक्क्यांनी वाढत 419 वर सूचीबद्ध झाले. त्याचवेळी, शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 413 वर सूचीबद्ध झाला, जो त्याच्या इश्यू किंमतीपेक्षा 3 टक्के अधिकने होता. या आयपीओची इश्यू किंमत 401 होती. आयपीओ 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. आयपीओ तीन दिवसांत 14.01 पट ओव्हरसबक्राइब झाला. किरकोळ श्रेणी 3.82 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार 31.26 पट आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत 14.83 पट आयपीओ सबस्क्राइब झाल्याचे समजते.
आयपीओतून 1,252 कोटीची उभारणी
सीगल इंडिया लिमिटेडचा इश्यू एकूण 1,252.66 कोटी होता. यासाठी कंपनी 684.25 कोटी किमतीचे 17,063,640 ताजे शेअर्स जारी करत आहे. तर, कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार 568.41 कोटी किमतीचे 14,174,840 शेअर्स ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएसद्वारे विकत आहे.
481 शेअर्ससाठी बोली
सीगल इंडिया लिमिटेडने या आयपीओची किंमत 380-401 वर निश्चित केली होती. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 37 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. जर एखाद्याने 401 च्या आयपीओवरच्या किंमत बँडनुसार 1 लॉटसाठी अर्ज केला तर, एखाद्याला त्यासाठी 14,837 ची गुंतवणूक करावी लागेल. त्याचवेळी, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी म्हणजेच 481 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात.