स्पाईस ब्लेंड्स अँड किचनमध्ये सी-फूड फेस्टिव्हल
पारंपरिक चवींचा जल्लोष
बेळगाव : ‘स्पाईस ब्लेंड्स बार अँड किचन’मध्ये ‘मुंबई कोळीज’ या सीफूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हा खास सी-फूड फेस्टिव्हल 10 ते 19 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध शेफ शिवनाथ मेर, शोभा मेर, लता तरे आणि योगिता तरे यांच्या कुशल हातांनी बनविलेल्या उत्कृष्ट, पारंपरिक कोळी मासाल्यांच्या मिश्रणाने तयार केलेल्या ताज्या माशांचे प्रदर्शन व विविध प्रकारची आणि स्वादिष्ट सी-फूड मेजवानी सादर केली जाणार आहे. यामधून मुंबईच्या किनारपट्टीवरील खाद्यसंस्कृतीचा अप्रतिम अनुभव मिळणार आहे. कोळी समाजाच्या समृद्ध खाद्यपरंपरेला उजाळा देणारा हा उत्सव पारंपरिक चव आणि ताज्या पदार्थांच्या सादरीकरणातून अविस्मरणीय ठरणार आहे. खास माशांच्या पाककृती, सुगंधी मसाले आणि पारंपरिक रेसिपींचा संगम या फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळणार आहे.
फेस्टिव्हलसाठी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेस विशेष बुफे मेन्यू उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या सीफूड पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. स्पाईस ब्लेंड्स बार अँड किचन हे बेळगावमधील उन्नत जेवनाचे प्रमुख ठिकाण आहे. याठिकाणी परिष्कृत वातावरणासाठी आणि अपवादात्मक पाककृती अनुभवांसाठी अद्वितीय कार्यक्रम आणि मेनू तयार करण्यात रेस्टॉरस्ट जागतिक आणि प्रादेशिक कलात्मकेसाठी वचनबद्ध मानले जाते. खाद्यप्रेमींसाठी हा सीफूड फेस्टिव्हल म्हणजे समुद्रातील चवींचा उत्सव आहे. येथे पारंपरिक आणि आधुनिक खाद्यकलेचा सुरेख संगम अनुभवता येईल.’ या सीफूड फेस्टिव्हलमधून कोकणी संस्कृती, मासोळीचे पदार्थ आणि समुद्रकिनारी चवींचे वैविध्य एकाच ठिकाणी अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाची पत्रकार परिषदेत माहिती देताना शेफ सचिन कोळी (एक्झिक्युटिव्ह शेफ स्पाईस ब्लेंड),अरबिंदा घोष (स्पाईस ब्लेंड रेस्टॉरंट मॅनेजर) व मुंबईचे शेफ उपस्थित होते.