For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसडीपीआयची राणी चन्नम्मा सर्कलमध्ये निदर्शने

11:30 AM Jun 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
एसडीपीआयची राणी चन्नम्मा सर्कलमध्ये निदर्शने
Advertisement

बेळगाव : काँग्रेस आमदार रमेश बंडीसिद्धेगौडा यांनी मुस्लीम समाजाची अवहेलना केली आहे. तसेच अधिकाऱ्याला फाशी देण्यासारखे वादग्रस्त विधान केले. याच्या निषेधार्थ जिल्हा एसडीपीआयच्यावतीने राणी चन्नम्मा सर्कलमध्ये निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर त्यांची पक्षातून हकालपट्टी करून राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. आमदार बंडीसिद्धेगौडा यांनी मुस्लीम समुदायाबद्दल द्वेषपूर्ण विधान केले आहे. तसेच एका सरकारी अधिकाऱ्याला फाशी देण्याची धमकी म्हणजे भारताच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांवर हल्ला केला आहे. हा केवळ एका समुदायाचा प्रश्न नसून मानवता, संविधान व समाजाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठीचा लढा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.