For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनमोड, रामनगर चेकनाक्यावर वाहनांची कसून तपासणी

10:11 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनमोड  रामनगर चेकनाक्यावर वाहनांची कसून तपासणी
Advertisement

वार्ताहर /रामनगर

Advertisement

लोकसभा निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू केल्यामुळे गोवा-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या अनमोड अबकारी चेकनाका येथे गोव्यातून कर्नाटकात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गोवा येथून कर्नाटकात आता गोवा बनावटीची दारूची आणणे मुश्किल झाले आहे. आचारसंहिता लागू केल्यामुळे दोन ते चार बाटल्या जरी  वाहनात सापडल्यास वाहन जप्त करण्याचा अधिकार अबकारी अधिकाऱ्यांना आहे. इतर तैनात अधिकाऱ्यांकडूनसुद्धा पैशाची तपासणी करण्यात येत आहे. रविवारी दुपारी छोटा हत्ती नामक टेम्पोतून दोन लाखाची रक्कम जप्त करण्यात आली. परंतु अनमोड येथील तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सायंकाळच्या वेळेस तपासणी करणे मुश्किल होत आहे. कारण दोन्ही बाजूने अवजड वाहनांना सोडत असल्याने वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा लागत आहेत. अनमोडबरोबरच रामनगर-बेळगाव मार्गावरही तपासणी नाका उभारण्यात आला असून, या ठिकाणीही बेळगाव तसेच महाराष्ट्रातील वाहनांचीही कसून तपासणी केली जाते. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत विनापरवाना पैशाची ने-आण करणेही आता व्यापारी वर्गाला कठीण झाले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.