महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अगसगे ग्रा.पं.कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी

10:37 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रोजगार हमी योजनेमध्ये नियमांचे उल्लंघन करून संपूर्ण काम केल्याची तक्रार : तक्रारीची तालुका पंचायत अधिकाऱ्यांकडून दखल

Advertisement

वार्ताहर /अगसगे

Advertisement

रोजगार हमी योजनेमध्ये नियमांचे उल्लंघन करून संपूर्ण काम मशिनरी वापरून करण्यात आले आहे म्हणून जि.पं.कडे दलित प्रगतीपर सेनेचे राज्य अध्यक्ष शिवपुत्र मैत्री यांनी तक्रार केली होती. याची चौकशी करण्यासाठी मंगळवार दि. 10 रोजी ता. पं. सहाय्यक संचालक बी. डी. कडेमनी, अभियंता मुरगेश यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी तक्रारदार शिवपुत्र मैत्री व माऊती नाईक हेही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित होते.कलमेश्वर गल्लीतील गणेश मंदिरपासून ते गावच्या तलावापर्यंत सुमारे एक किलोमीटर रस्त्यासाठी रोहयो योजनेमध्ये सुमारे 17 लाख 37 हजार 344 ऊपये निधी मंजूर झाला होता. यामध्ये 5 लाख 47 हजार 230 चे काम रोहयो योजनेतील मजुराकडून करून घ्यावे आणि 11 लाख 91 हजार 14 ऊपयांचे काम मशिनरीच्या आधारे करण्याची शासनाची निविदा आहे. मात्र संपूर्ण शंभर टक्के काम मशिनरीच्या आधारे करण्यात आले आहे, असा आरोप दलित प्रगतीपर सेनेचे राज्याध्यक्ष शिवपुत्र मैत्री यांनी यावेळी केला.

पीडीओ यांनी आपण शासनाच्या नियमानुसार काम केले आहे, असे सांगितले. तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व्हे नंबर 81 मध्ये सुमारे एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी सुमारे 16 लाख ऊपये मंजूर झाले आहेत. यामध्ये मेटलिंग न करता केवळ माती टाकून संपूर्ण निधी हडप केल्याचा आरोप हंदिगनूरचे सामाजिक कार्यकर्ते माऊती वैजू नाईक यांनी अधिकाऱ्यांकडे केला. यावेळी पीडिओ एन. ए. मुजावर यांनी आपण नियमाप्रमाणे काम केल्याचे सांगितले. या दोन्ही तक्रारदारांचे लेखी अहवाल घेऊन संबंधित स्थळाला जाऊन पंचनामा केला व या पंचनामाचा अहवाल महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जिल्हा ओम्बुड्समन यांच्याकडे संपूर्ण अहवाल सादर करतो, असे ता.पं. सहाय्यक संचालक अधिकारी बी. डी. कडेमनी यांनी सांगितले. यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष अमृत मुद्देनावर, सदस्य गुंडू कुरेनावर, ग्रामस्थ संतोष मैत्री, अपय्या कोलकर, विनायक रेडकर, रमेश लट्टी, परशराम कंग्रांळकर, संजय घेवडी आदी उपस्थित होते.

13 रोजी जिल्हा ओम्बुड्समन न्यायालयात चौकशी

शिवपुत्र मैत्री आणि माऊती वैजू नाईक या दोन्ही तक्रारदारानी रोहयो योजनेमध्ये नियमबाह्य कामे झाले असून त्यामध्ये भ्रष्टाचारही झाला आहे, अशी तक्रार केली आहे. यासंबंधी तालुका पंचायत सहाय्यक संचालक अधिकारी बी. डी. कडेमनी, अभियंता मुरगेश यांनी सध्या घटनास्थळी येऊन कागदपत्रे आणि संबंधित दोन्ही रस्त्यांची पाहणी करून तक्रारदाराकडून आणि पीडीओ एन. ए. मुजावर या दोघांचे लेखी पंचनामा केला असून यासंबंधी संपूर्ण अहवाल ओम्बुड्समनकडे पाठवणार असून याची चौकशी जिल्हा ओम्बुड्समन न्यायालयात दि. 13 रोजी होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article