महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाचवी मूल्यमापन परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीला प्रारंभ

10:53 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आठवी-नववीचीही लगोलग तपासणी होणार

Advertisement

बेळगाव : पाचवीची मूल्यमापन परीक्षा संपताच बुधवारपासून पेपर तपासणीला सुरुवात करण्यात आली. शहरातील मराठी विद्यानिकेतन येथे मराठी, कन्नड, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली जात आहे. निकाल लवकर देण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. सोमवार दि. 11 मार्चपासून सुरू झालेल्या मूल्यांकन परीक्षांना मध्यंतरी न्यायालयाच्या स्थगितीने ब्रेक लागला होता. त्यानंतर आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून पुन्हा या परीक्षांना सुरुवात झाली. पाचवी, आठवी व नववी या तीन वर्गांच्या मूल्यांकन परीक्षा घेण्यात आल्या. पाचवीची मूल्यांकन परीक्षा मंगळवारी संपताच बुधवारपासून पेपर तपासणीला सुरुवात करण्यात आली.

Advertisement

आठवी-नववीची पेपर तपासणी आजपासून

पाचवी मूल्यमापनाला सुरुवात करताच आठवी-नववीच्या पेपर तपासणीला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. गुरुवारी आठवी व नववीचा शेवटचा पेपर असला तरी दहावीचा पेपर नसल्याने शिक्षकांकडून मूल्यांकन परीक्षेचे पेपर तपासून घेतले जाणार आहेत. सेंट अँथनी शाळेमध्ये कन्नड माध्यम, शर्मन स्कूल येथे इंग्रजी माध्यम तर महिला विद्यालय येथे मराठी व उर्दू माध्यमाच्या उत्तरपत्रिका तपासल्या जाणार आहेत.

पेपर तपासणी सुरू

लवकर निकाल लागावा यासाठी मूल्यांकन परीक्षांच्या पेपर तपासणीला सुरुवात करण्यात आली. बुधवारपासून पाचवी तर गुरुवारपासून आठवी व नववीच्या उत्तरपत्रिका तपासल्या जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या नियमावलीनुसार पेपर तपासणी सुरू करण्यात आली आहे.

लिलावती हिरेमठ, गटशिक्षणाधिकारी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article