महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘गोंय स्वातंत्र्याचे होमखण’ चित्रपटाचे मडगावात प्रदर्शन

11:37 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : गोवा मुक्ती लढा म्हणजे इतिहासातला अपघात नव्हता. त्याच्या मागे हजारो ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांची तपश्चर्या होती. त्याग होता आणि बलिदानही होते. तो इतिहास म्हणजे धगधगते पान आहे. त्यामुळे या मुक्तीलढ्याची माहिती नव्या पिढीपर्यंत माहितीपटाच्या माध्यमातून पोचणे गरजेचे असून त्यासाठी हा माहितीपट तयार केला, अशी माहिती चित्रपट निर्मात्या लेखिका ज्योती कुंकळकर यांनी दिली. ‘गोंय स्वातंत्र्याचे होमखण’ या माहितीपटाचे चौगुले महाविद्यालयात शुक्रवारी प्रदर्शन झाले. त्यावेळी व्यासपीठावर डॉ. सुप्रिया प्रभुदेसाई धोंड, डॉ. संगीता साखळकर, इतिहासाच्या प्राध्यापिका सरिता नाईक तारी व संपदा कुंकळकर उपस्थित होत्या. तब्बल साडेचारशे वर्षांचा इतिहास ज्योती कुंकळकर यांनी अवघ्या एका तासात अत्यंत प्रभावीपणे मांडला आणि मी भारावून गेले, असे डॉ. सुप्रिया प्रभुदेसाई धोंड  यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात गोव्यातील वेगवेगळ्या महाविद्यायांत, विद्यापीठ तसेच विद्यालयात माहितीपटाचे प्रदर्शन केले जात आहे. या कार्यक्रमात चौगुले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता साखळकर यांनी स्वागत आणि प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन वनेसा वार्रूश कुलासो यांनी केले. सरिता नाईक तारी यांनी आभार मानले. माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना ज्योती कुंकळकर आणि संपदा कुंकळकर यांनी उत्तरे दिली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article