लोककल्पतर्फे स्क्रिन छपाईचे प्रशिक्षण
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या 32 गावांमधील महिलांसाठी स्क्रिन प्रिटिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रामीण महिलांना रोजगारक्षम कौशल्ये देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. हे प्रशिक्षण विजय साठे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. ते स्क्रिन प्रिंटिंग क्षेत्रातील तज्ञ असून त्यांनी महिलांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून छपाईच्या विविध तंत्रांची महिती दिली. यावेळी महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध साहित्यावर आकर्षक डिझाईन तयार करून छपाई कशी करायची हे शिकले. या कौशल्याच्या माध्यमातून त्यांना लघु उद्योगांच्या स्वरुपात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची आणि उत्पन्न मिळविण्याची संधी मिळाली आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सेसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली फौंडेशन महिलांच्या कौशल्यविकासावर आणि शाश्वत उत्पन्ननिर्मितीच्या संधींवर सातत्याने भर देत आहे. त्याअंतर्गत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.