किर्गिस्तानमध्ये आज ‘एससीओ’ची बैठक
भारतातर्फे राजनाथ सिंह भाग घेणार : जागतिक शांतता-सुरक्षेवर होणार चर्चा
वृत्तसंस्था/ बिश्केक
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे मंगळवारी किर्गिस्तानच्या बिश्केकमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. जगासमोरील सुरक्षा आव्हानांदरम्यान जागतिक शांततेबद्दल भारताची प्रतिबद्धता अधोरेखित करणार आहे. दहशतवाद आणि कट्टरवादाबद्दल शून्य सहिष्णूतेची देशाची दृढ भूमिकाही स्पष्ट करणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.
एससीच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक एक महत्त्वपूर्ण बहुपक्षीय व्यासपीठ आहे, जे सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांना क्षेत्रीय सुरक्षा मुद्दे, दहशतवादविरोधी रणनीति आणि सैन्य सहकार्यावर विचारविनिमय करण्यासाठी एकत्र आणते. बिश्केकमध्ये आयोजित होणाऱ्या बैठकीत यूरेशिया क्षेत्रातील सुरक्षा आव्हाने आणि अस्थिरता तसेच कट्टरवादाबद्दल सामूहिक प्रतिक्रियांना मजबूत करण्यावर विशेष लक्ष देण्यात येईल अशी अपेक्षा आहे.
दहशतवाद विरोधात समन्वित कारवाईच्या महत्त्वाला उघड करण्यासाठी भारताने या व्यासपीठाचा सातत्याने वापर केला आहे. मागील बैठकांमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विश्वास निर्माण करणारी उपाययोजना, क्षेत्रीय स्थिरता आणि कट्टरवाद विरोधात ठोस कारवाईच्या आवश्यकतेवर जोर दिला होता. तसेच शांततापूर्ण आणि सुरक्षित शेजारासाठी भारताच्या दृष्टीकोनाचा पुनरुच्चार केला आहे.