For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वैज्ञानिकांची मिरर युनिव्हर्सची थेअरी होतेय ट्रेंड

06:07 AM Jan 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
वैज्ञानिकांची मिरर युनिव्हर्सची थेअरी होतेय ट्रेंड
Advertisement

वैज्ञानिकांदरम्यान एक रंजक आणि काहीशी अजब चर्चा होत आहे. आमचे ब्रह्मांड एकटा नाही का? बिग बँगपूर्वी एक आरशासारखे ब्रह्मांड होते का? जेथे काळ आमच्या दिशेपेक्षा उलट चालतो आणि एंटीमॅटर अधिक आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही कल्पना सर्वप्रथम 2018 मध्ये तीन भौतिकशास्त्रज्ञ लॅथम बॉयल, कियरन फिन आणि नील ट्यूरॉक यांनी मांडली होती. त्यांनी फिजिकल रिह्यू लेटर्स नावाच्या प्रसिद्ध नियतकालिकात एक पेपर प्रकाशित केला होता. आता ही कल्पना पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होतेय. ब्रह्मांड सीपीटी-सिमेट्रिक असल्याचे त्यांचे सांगणे आहे.

Advertisement

 

सीपीटी सिमेट्री म्हणजे काय?

भौतिकशास्त्रात एक महत्त्वपूर्ण नियम आहे-सीपीटी सिमेट्री याचा अर्थ...

Advertisement

सी (चार्ज) : कणांना त्यांच्या विपरित चार्जयुक्त (उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनला पॉजिट्रॉन)मध्ये बदला

पी (पॅरिटी) : उजव्या-डाव्याला उलटे करा, जसे आरशात पाहणे

टी (टाइम) : काळाची दिशा उलटी करा

या बदलासोबतही भौतिकशास्त्राचे नियम तेच राहतात. परंतु आमचा ब्रह्मांड काळात समोरच्या बाजूने चालते आणि मॅटर अधिक, एंटीमेटर कमी, यामुळे सीपीटी सिमेट्री तुटत असल्याचे वाटते.

मिरर युनिव्हर्सची कल्पना

ब्रह्मांड एकटे नाही, तर एक जोडी आहे. आमचे ब्रह्मांड आणि त्याचा आसारा-एंटी युनिव्हर्स आहे. बिग बँग या दोन्हींदरम्यान केंद्रबिंदू असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आडे.

-अमाच्या ब्रह्मांडात काळ समोर चालतो, मॅटर अधिक आहे.

-आरशासारख्या ब्रह्मांडात काळ मागील बाजूने चालतो. एंटीमॅटर अधिक आहे.

ही जोडी मिळून सीपीटी सिमेट्रीला पूर्ण करते. जे आरशात तुमचे उलटे प्रतिबिंबद पाहून पूर्ण चित्र संतुलित वाटते.

हा विचार का खास आहे?

हे मॉडेल ब्रह्मांडाच्या अनेक मोठ्या कोड्यांना सोडविण्याचा दावा करते.

मॅटर-एंटीमॅटर असंतुलन : बिग बँगमध्ये समोर मॅटर आणि एंटीमॅटर निर्माण व्हायला हवे होते, जे परस्परांमध्ये धडकून संपले असते. परंतु आमचा ब्रह्मांड मॅटरने भरलेला आहे. मिरर युनिव्हर्समध्ये एंटीमॅटर अधिक असल्याने संतुलन तयार होते.

डार्क मॅटर : हा अदृश्य पदार्थ ब्रह्मांडाचा मोठा हिस्सा आहे. मोठ्या राइट-हँडेडल न्यूट्रिनो डार्क मॅटर असू शकतात असे मॉडेलचे सांगणे आहे.

पुरावा काय

सध्या कोणताच थेट पुरावा नाही. हा एक सैद्धांतिक विचार असून तो गणितीयस्वरुपात सुंदर आहे. नील ट्यूरॉक अलिकडच्या वर्षांमध्ये यावर बोलत आहेत. हे ब्रह्मांडला अधिक सरल करते असे ते सांगतात. परंतु अनेक वैज्ञानिकांना याबद्दल संशय आहे. ही केवळ एक चांगली कहाणी आहे. पंरतु निरीक्षणाने सिद्ध होत नाही असे त्यांचे सांगणे आहे. सीईआरएन यासारख्या प्रयोगशाळांमध्ये न्यूट्रिनोवर प्रयोग होत असून ते न्यूट्रिनो द्रव्यमान रहित आहे की नाही हे तपासले जात आहे. भविष्यात असे प्रयोग या मॉडेलला योग्य ठरविणारे ठरल्यास ब्रह्मांडाबद्दलचे ज्ञान पूर्णपणे बदलणार आहे.

Advertisement
Tags :

.