आकाशगंगे बाहेरील ताऱ्यांचे पहिले क्लोजअप छायाचित्र
वैज्ञानिकांनी आमची आकाशगंगा म्हणजेच मिल्कीवेच्या बाहेर असलेल्या ताऱ्याचे पहिले क्लोजअप छायाचित्र मिळविले आहे. हा तारा पृथ्वीपासून 1.60 लाख प्रकाशवर्षे दूर आहे. हा दुसऱ्या आकाशगंगेतील तारा आहे. याच्या चहुबाजूला विशाल आकाराचे मॅग्नेटिक क्लाउड्स आहेत. याचा आकार आमच्या सूर्याच्या रेडियसपेक्षा 2 हजार पट अधिक आहे. काही काळापूर्वीपर्यंत वैज्ञानिक याला केवळ ‘द मॉन्स्टर’ संबोधित होते. सध्या याला डब्ल्यूओएच जी64 हे नाव देण्यात आले आहे. हा तारा एका ड्वार्फ गॅलेक्सीत आहे. म्हणजेच छोटी गॅलेक्सी जी आमच्या गॅलेक्सीच्या चहुबाजूला फिरत आहे. याचे क्लोजअप छायाचित्र काढण्यासाठी वेरी लार्ज टेलिस्कोप इंटरफेरोमीटरचा वापर करण्यात आला. ही टेलिस्कोप युरोपियन साउदर्थ ऑब्जर्वेटरीमध्ये आहे, जी अंतराळात खोलवर झूम करून पाहू शकते.
नव्या तंत्रज्ञानाचा वापर
डब्ल्यूओएच जी64 तारा बेटलगूजपेक्षा तीनपट मोठा आहे, परंतु अंतर आमच्या पृथ्वीपासून 250 पट अधिक आहे. याचमुळे अत्यंत छोटा आणि धूसर दिसून येत आहे. ओनाका आणि त्यांचे सहकारी या ताऱ्याचे अध्ययन अनेक वर्षांपासून करत आहेत. यासाठी या लोकांनी नवे तंत्रज्ञान ग्रॅव्हिटी विकसित केले आहे. याच्या माध्यमातून छोट्या आणि धूसर गोष्टींची छायाचित्रे मिळविली जातात.
मृत्यूच्या दारात तारा
2020 पासून ओनाका आणि त्यांची टीम या ताऱ्याची छायाचित्रे मिळवित आहे. हा तारा आता मृत्यूच्या दारात असल्याचे त्यांना आढळून आले आहे. सध्या या ताऱ्यातून सातत्याने प्रकाश बाहेर पडत आहे. धूळ निघत आहे, त्याच्या चहुबाजूला ढग तयार होत आहेत. हे ढग भयानक किरणोत्सर्गी, तप्त आणि तीव्र काशयुक्त आहेत.