For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आकाशगंगे बाहेरील ताऱ्यांचे पहिले क्लोजअप छायाचित्र

07:00 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आकाशगंगे बाहेरील ताऱ्यांचे पहिले क्लोजअप छायाचित्र
Advertisement

वैज्ञानिकांनी आमची आकाशगंगा म्हणजेच मिल्कीवेच्या बाहेर असलेल्या ताऱ्याचे पहिले क्लोजअप छायाचित्र मिळविले आहे. हा तारा पृथ्वीपासून 1.60 लाख प्रकाशवर्षे दूर आहे. हा दुसऱ्या आकाशगंगेतील तारा आहे. याच्या चहुबाजूला विशाल आकाराचे मॅग्नेटिक क्लाउड्स आहेत. याचा आकार आमच्या सूर्याच्या रेडियसपेक्षा 2 हजार पट अधिक आहे. काही काळापूर्वीपर्यंत वैज्ञानिक याला केवळ ‘द मॉन्स्टर’ संबोधित होते. सध्या याला डब्ल्यूओएच जी64 हे नाव देण्यात आले आहे. हा तारा एका ड्वार्फ गॅलेक्सीत आहे. म्हणजेच छोटी गॅलेक्सी जी आमच्या गॅलेक्सीच्या चहुबाजूला फिरत आहे. याचे क्लोजअप छायाचित्र काढण्यासाठी वेरी लार्ज टेलिस्कोप इंटरफेरोमीटरचा वापर करण्यात आला. ही टेलिस्कोप  युरोपियन साउदर्थ ऑब्जर्वेटरीमध्ये आहे, जी अंतराळात खोलवर झूम करून पाहू शकते.

Advertisement

आम्ही या ताऱ्याच्या चहुबाजूला ककून सारखे अंडाकृती ढगांचे कडे पाहिले आहे. याचा अर्थ हे ढग या ताऱ्याच्या मृत्यूमुळे तयार होत असावेत असाही असू शकतो. हा तारा मृतपाय ठरत असावा किंवा सध्या हा सुपरनोव्हा विस्फोटाला सामोरा जात असावा असे चिलीच्या आंद्रे बेलो नॅशनल युनिव्हर्सिटीच्या एस्ट्रोफिजिसिस्ट किची ओनाका यांनी म्हटले आहे. आकाशगंगेच्या बाहेरील ताऱ्यांची छायाचित्रे मिळविणे अत्यंत कठिण कार्य आहे. याचे सर्वात उत्तम उदाहरण रेड जायंट स्टार बेलटगूज आहे. जो आमच्या सूर्याच्या रेडियसपेŠा 764 पट अधिक मोठा आहे. हा आमच्यापासून 650 प्रकाशवर्षे दूर आहे. याच्या छायाचित्रांमध्ये प्रकाश इतका अधिक धूसर होतो, की वैज्ञानिक प्रकाशात होत असलेल्या बदलांना समजूच शकत नाहीत.

नव्या तंत्रज्ञानाचा वापर

Advertisement

डब्ल्यूओएच जी64 तारा बेटलगूजपेक्षा तीनपट मोठा आहे, परंतु अंतर आमच्या पृथ्वीपासून 250 पट अधिक आहे. याचमुळे अत्यंत छोटा आणि धूसर दिसून येत आहे. ओनाका आणि त्यांचे सहकारी या ताऱ्याचे अध्ययन अनेक वर्षांपासून करत आहेत. यासाठी या लोकांनी नवे तंत्रज्ञान ग्रॅव्हिटी विकसित केले आहे. याच्या माध्यमातून छोट्या आणि धूसर गोष्टींची छायाचित्रे मिळविली जातात.

मृत्यूच्या दारात तारा

2020 पासून ओनाका आणि त्यांची टीम या ताऱ्याची छायाचित्रे मिळवित आहे. हा तारा आता मृत्यूच्या दारात असल्याचे त्यांना आढळून आले आहे. सध्या या ताऱ्यातून सातत्याने प्रकाश बाहेर पडत आहे. धूळ निघत आहे, त्याच्या चहुबाजूला ढग तयार होत आहेत. हे ढग भयानक किरणोत्सर्गी, तप्त आणि तीव्र काशयुक्त आहेत.

Advertisement
Tags :

.