‘हंपबॅक डॉल्फीन’साठी 17 देशातील 71 शास्त्रज्ञ एकवटले
रत्नागिरी प्रतिनिधी
पश्चिम हिंद महासागर क्षेत्रात येणाऱ्या देशातील सागरी जीवशास्त्रज्ञ डॉल्फिनच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींना वाचवण्याच्या ध्येयाने एकत्र आले आहेत. त्यांनी एक नेटवर्क तयार केले आहे ज्याचे नाव ‘हिंद महासागर हंपबॅक डॉल्फिन संवर्धन नेटवर्क’ (प्ल्अऱू ) असे आहे. शास्त्रज्ञांच्या या मोहिमेचे उद्दिष्ट लोकांना जोडणे, माहितीचे आदानप्रदान करणे तसेच इतरांना प्रेरीत करणे हे आहे. पश्चिम भारतीय महासागर आणि अरबी समुद्र क्षेत्राच्या 17 देशांतील 71 सागरी शास्त्रज्ञ आणि संवर्धक (प्ल्अऱू ) च्या छत्राखाली एकत्र काम करत आहेत.
बहुतेक लोकांनी हिंदी महासागर हंपबॅक डॉल्फिनबद्दल कधीच ऐकलेही नसेल. ते इतर डॉल्फिनसारखेच दिसतात. परंतु त्यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे ते फक्त उथळ पाण्यात आढळतात. त्यामुळे सहसा ते किनाऱ्याच्या अगदी जवळ असतात. त्यांचा स्वभाव लाजाळू असतो व ते खूप आकर्षक वाटतात. असे हे दुर्मीळ हंपबॅक डॉल्फिन लहान गटात राहतात. मुख्यत्वे ते पाण्याच्या अऊंद पट्ट्यात राहतात. पूर्व आफ्रिका, पश्चिम आशिया, भारताचे दक्षिण व श्रीलंकेचे उत्तरेकडील टोक, तसेच मादागास्कर आणि मेयोट सारख्या बेटांच्या प्रदेशात त्यांचे अस्तित्व अधिक पहायला मिळते. त्यांचा अधिवास असलेल्या 23 देशांपैकी बरेचसे देश कमी उत्पन्न असलेले आहेत.
आतापर्यंत जे शिकलो ते वैशिष्ट्यापूर्ण - डॉ. शानन अॅटकिन्स
या डॉल्फिन्सबद्दल आम्हाला बरेच काही माहित नाही. परंतु आम्ही आतापर्यंत जे शिकलो ते वैशिष्ट्यापूर्ण आहे, असे प्रकल्पाचे समन्वयक डॉ. शानन अॅटकिन्स यांचे म्हणणे आहे. बहुतेक ठिकाणी डॉल्फिनची संख्या कमी होत चालली आहे. याचे कारण म्हणजे ते अधिक लोकसंख्या असलेल्या किनारपट्टीच्या जवळ आढळतात. परिणामी जमिनीवर, गोड्या पाण्यात तसेच समुद्रात होणाऱ्या प्रचंड मानवी हस्तक्षेपांमुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. बऱ्याचदा ते मासेमारीच्या जाळ्यात अडकून मरतात. त्याचबरोबर बंदरांची बांधणी, किनाऱ्यांचा विकास व जमीन सुधारणा आदी कारणांमुळे त्यांच्या अधिवासावर नकारात्मक परिणाम होत आहे. रसायने व पाण्याखालील आवाज यासारख्या प्रदूषणाला ते अतिसंवेदनशील असतात. या क्रियाकलापांमुळे हंपबॅक डॉल्फिनचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत आहे.
आर्थिक पाठबळाअभावी संशोधनात अडचणी
संशोधकांना डॉल्फिन संशोधन करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. भारतातील हंपबॅक डॉल्फिनचा अभ्यास करणाऱ्या केतकी जोग सांगतात, दीर्घकालीन संशोधनाचे कार्य टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते ते मिळत नाही. दक्षिण आफ्रिकेतील, साशा डायन्स हिचेही काहीसे असेच म्हणणे आहे. तिच्या मते, संशोधन करताना आवश्यक उपकरणे, कर्मचारी आणि निधी यांच्या मर्यादा येतात. याचबरोबर इतरही काही महत्वाच्या आव्हानांमध्ये पुरेसा डेटा नसणे, तांत्रिक असमर्थता, योग्य उपाययोजना यांचा अभाव, प्रजातींबद्दलच्या जागरुकतेबाबतचा अभाव तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाईचा अभाव इत्यादी बाबींचा समावेश होतो.
शास्त्रज्ञ समान ध्येयाने प्रेरित
पश्चिम भारतीय महासागर आणि अरबी समुद्र क्षेत्राच्या 17 देशांतील 71 सागरी शास्त्रज्ञ आणि संवर्धक आता (प्ल्अऱू ) च्या छत्राखाली एकत्र काम करत आहेत. सदस्य संशोधकांचे संशोधनाला चालना देण्यासाठी समान ध्येय आहे. संशोधनाचे उत्तम कार्य पार पाडण्यासाठी समान ध्येयाने ते प्र्रेरित झाले आहेत. लुप्त होत चाललेल्या हंपबॅक डॉल्फीन प्रजातींबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करत त्यांचे संवर्धन करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी कामाची आखणी केली आहे. हंपबॅक डॉल्फिनबद्दलच्या अधिक माहितीसाठी www.प्ल्dदहू.दु या वेबसाइटला भेट द्या. असे आवाहन करण्यात आले आहे. प्ल्अऱू चा हा प्रारंभिक टप्पा प्रिटोरिया विद्यापीठ, झायेद विद्यापीठ, सेंट अँड्र्यूज विद्यापीठ, Aिंण्ध्झ् थ्td आणि ऊाम्प्ब्Aजे यांच्या पाठिंब्याने शक्य झाला आहे.