वैज्ञानिकांकडून ‘म्युझिकल लॉलिपॉप’ची निर्मिती
चघळताच डोक्यात वाजणार गाणे
तंत्रज्ञानाचे जग दरदिनी नवा आविष्कार करत असून यामुळे कल्पना आणि वास्तवामधील भिंत कोसळत चालली आहे. अलिकडेच लास वेगासामध्ये एक किरकोळ दिसणारा लॉलिपॉप सादर करण्यात आला आहे. हा लॉलिपॉप केवळ स्वाद वाढविणारा नसून तुमच्या मेंदूत एक पूर्ण कॉन्सर्ट सुरू करणारा आहे.
टेक सायंटिस्ट्सकडून निर्मित या लॉलिपॉपला चघळताच मेंदूत गाणे वाजण्यास सुरू होईल. अमेरिकेच्या लावा टेक ब्रँड्सने ही कँडी सादर केली असून याचे उत्पादन चीनमध्ये होते. या अजब गॅजेटचे नाव ‘लॉलिपॉप स्टार’ ठेवण्यात आले असून ते बोन कंडक्शन तंत्रज्ञानावर काम करते. या लॉलिपॉपला दातांनी स्पर्श करताच याची खास बनावट ध्वनि तरंगांना तुमच्या जबड्यातील हाडांद्वारे थेट तुमच्या अंतर्गत कानापर्यंत पोहोचविते. यामुळे तुमच्या आसपास उभ्या लोकांना काहीच ऐकू येणार नाही, परंतु तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या पसंतीचे संगीत वाजू लागेल. कंपनीने याची किंमत केवळ 750 रुपये ठेवली असून लोक याला ‘जगातील सर्वात स्वस्त आणि स्वादिष्ट हेडफोन’ ठरवत आहेत.
श्रवणशक्ती समस्या असलेल्या लोकांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकते. कारण हे तंत्रज्ञान कानाच्या बाहेरील हिस्स्याला पूर्णपणे बायपास करते. ही कँडी केवळ मनोरंजन नसून भविष्याच्या कम्युनिकेशनचे नवे माध्यम असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. सध्या याचे अनेक फ्लेवर्स बाजारात दाखल झाले असू यातील प्रत्येक फ्लेवरसोबत एक वेगळ्या प्रकारचा म्युझिक ट्रॅक जोडलेला असतो.