For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विज्ञान प्रदर्शनातून भावी वैज्ञानिक घडतील; आ. राजूबाबा आवळे

08:00 PM Dec 06, 2023 IST | Abhijeet Khandekar
विज्ञान प्रदर्शनातून भावी वैज्ञानिक घडतील  आ  राजूबाबा आवळे
mla Rajubaba Awle
Advertisement

विज्ञान प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन निर्माण होणारी वैज्ञानिकांची भावी पिढी भारताचे नाव विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उज्वल करतील असे प्रतिपादन आ. राजूबाबा आवळे यांनी केले . किणी हायस्कूल किणी येथे आयोजित केलेल्या ५१ व्या हातकणंगले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

Advertisement

हातकणंगले तालुक्यातील सुमारे ३५० प्राथमिक व माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला असून उच्च प्राथमिक विद्यार्थी गटात १०४ , माध्यमिक विद्यार्थी गटात ६४ , प्राथमिक शिक्षक गटात १०, माध्यमिक शिक्षक गटात १२ , प्रयोगशाळा परिचर गटात ९ तर दिव्यांग विद्यार्थी गटात ४ अशा एकूण २०३ वैज्ञानिक उपकरणांचा सहभाग आहे.

यावेळी माजी जि . प . सदस्य अरुणराव इंगवले, पुष्पाताई आळतेकर, पं. समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील , बी . जी . बोराडे , किणीच्या सरपंच सुप्रिया समुद्रे ,उपसरपंच अशोक माळी , गट विकास अधिकारी शबाना मोकाशी गटशिक्षणाधिकारी जे . टी . पाटील , विस्तार अधिकारी शिवाजी बोरचाटे , किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी सर्व संचालक , मुख्याध्यापक बी. डी . मलगुंडे ,पर्यवेक्षक डी .डी . चव्हाण आदी उपस्थित होते .

Advertisement

Advertisement
Tags :

.