For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विज्ञान प्रदर्शनातून भविष्यातील वैज्ञानिक घडतील

11:06 AM Dec 24, 2024 IST | Pooja Marathe
विज्ञान प्रदर्शनातून भविष्यातील वैज्ञानिक घडतील
Science exhibitions will create future scientists
Advertisement

आमदार चंद्रदीप नरके
करवीर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात २२२ उपकरणांचा सहभाग
कोल्हापूर
शालेय जीवनातील संस्कारच उद्याचे आदर्श नागरिक घडवत असतात .शालेय जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे .भविष्यातील वैज्ञानिक या विज्ञान प्रदर्शनातून घडतील असा विश्वास करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला .
शिक्षण विभाग पंचायत समिती करवीर व सांगरूळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगरूळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करवीर तालुकास्तरीय विज्ञान विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे होते .
यावेळी बोलताना आमदार नरके यांनी शालेय जीवनात गणित आणि विज्ञानाला खूप मोठे महत्त्व आहे .मिळवलेले ज्ञान कोणालाही काढून घेता येत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे ज्ञानार्जन करून आपली ज्ञान संपत्ती वृद्धिंगत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले .
अध्यक्षस्थानावरून बोलताना यशवंतराव खाडे यांनी समुद्राच्या लाटा पासून वीज निर्मिती या सांगरूळ या स्कूलच्या उपकरणाची दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये निवड झाली होती .या ठिकाणी तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी पंतप्रधान इंदिराजी गांधी व उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी या उपकरणाचे कौतुक करून सन्मान केला होता . संस्थेच्या व शाळेच्या दृष्टीने भूषणावह होते असे सांगितले
सुरुवातीस स्वागत सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस एम नाळे यांनी केले .प्रास्ताविक करताना करवीरचे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील यांनी सांगोळे हायस्कूल येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनात २२२ उपकरणे सहभागी झाले असल्याचे सांगितले .विज्ञान प्रदर्शनात मिळालेले ज्ञान आत्मसात करून त्याचा व्यवहारात उपयोग करावा असे आवाहन केले
यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व रोपट्यास पाणी घालून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले . १९७९ - ८० ला राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात स्तरावर निवड झालेल्या सांगरूळ हायस्कूलचे तत्कालीन विद्यार्थी प्राध्यापक बापूसो लोंढे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला .
निसर्गमित्र अनिल चौगुले यांचा रानभाज्या रानचारा देशी औषधी वनस्पती व दुधाळ जनावरांचे संगोपन याबाबत व्याख्यान झाले .
यावेळी सांगरूळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष के ना जाधव खजाणीस डी जी खाडे संचालक आनंदा कसोटे कुंभीचे व्हा .चेअरमन राहुल खाडे संचालक बी बी पाटील संजय डी पाटील विस्तार अधिकारी विजय ओतारी प्रकाश आंग्रे अर्चना पात्रे आनंदराव आकुर्डेकर सुजाता गायकवाड केंद्रप्रमुख संभाजी पाटील यांचे सह विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते .आभार पर्यवेक्षक एस के पाटील यांनी मानले .

Advertisement

Advertisement
Tags :

.