Kolhapur News | एन.एस.पाटील शैक्षणिक संकुल सांगवडे येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांनी तयार केले १०४ वैज्ञानिक उपकरणे; उत्साही वातावरण
सांगवडे - एन.एस. पाटील शैक्षणिक संकुल सांगवडे येथे अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी १०४ वैज्ञानिक उपकरणे निर्माण केली होती विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामगोंडा पाटील होते त्याचबरोबर नूतन जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत व पंचायत समिती सदस्य अनिता कांबळे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर बोभाटे यांनी केले तसेच स्वागत अश्विनी पाटील यांनी केले त्याचबरोबर पाहुण्यांची ओळख महेश वडेर यांनी केली तसेच प्रमुख पाहुणे सुदर्शन खोत बोलताना म्हणाले विज्ञान हाच देशाचा उज्वल पाया आहे दैनंदिन जीवनात वैज्ञानिक गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केले पंचायत समिती सदस्य अनिता कांबळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले याप्रसंगी उपस्थित संस्थेचे सर्व संचालक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे आभार एस.बी.पाटील सर यांनी केले
फोटो ओळ-सांगवडे येथे विज्ञान प्रदर्शन उद्घाटना वेळी सर्व प्रमुख मान्यवर