For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजपासून शाळा गजबजणार

03:53 PM Jun 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजपासून शाळा गजबजणार
Advertisement

डिचोलीत तीन विनाअनुदानित शाळांना अनुमती

Advertisement

पणजी : नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 ची सुरुवात आज शनिवार दि. 6 जूनपासून सुरु होत असून डिचोली तालुक्यात तीन विना अनुदान तत्त्वावर प्राथमिक शाळांना अनुमती देण्यात आली आहे. शिक्षण खाते संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की, शाळा ठरल्याप्रमाणे 6 जूनपासूनच सुरु होणार असून पहिल्या दिवशी एकंदरित परिस्थिती पाहून शाळा कदाचित लवकर सोडल्या जातील. तांत्रिक दृष्टीने शाळांचे दिवस पूर्णपणे भरावेत म्हणून शनिवारपासून शाळा सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शनिवारी कदाचित उपस्थिती कमी असू शकते पण सोमवारपासून पूर्ण क्षमतेने शाळा सुरु होतील, अशी खात्री त्यांनी वर्तवली. किती प्राथमिक शाळा यावर्षी बंद पडल्या याची माहिती आता कळू शकत नाही तर 30 जूनपर्यंत आम्ही विद्यार्थी येणार म्हणून वाट पाहतो. त्यानंतर शाळा बंद पडल्याचे निदर्शनास येते. प्राथमिक शाळांचे एकत्रीकरण व्हावे म्हणून सरकारचा प्रस्ताव असला तरी पालकवर्ग त्यासाठी तयार होत नाही. म्हणून यावर्षी तरी शाळांचे तसे एकत्रीकरण झालेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली. नवीन शिक्षण धोरणानुसार शाळांची कार्यवाही सुरु असून पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळा जुन्या पद्धतीनुसार एप्रिलऐवजी थेट जूनपासूनच सुरु होतील, असेही त्यांनी नमूद केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.